Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला माहितच असेल आता Whatsapp वर तुम्ही ब्लू टिक लावू शकता.
पुढे आपण Whatsapp वर ब्लू टिक कसे मिळवायचे आणि काही नियम जाणून घेणार आहोत.
ज्यांचे व्हाट्सॲपचे विजनेस अकाउंट आहे. त्यांनाच ब्लू टिक मिळू शकतं.
तुम्ही यात मेटा व्हेरिफाइड हे एक पैसे देऊन सबस्किप्शन देऊन व्हेरिफाइड बॅज ची सुविधा मिळवू शकता.
सगळ्यात आधी Whatsapp Business ॲप उघडा.
ॲंड्रॉइड फोनमध्ये कोपऱ्यातील ३ ठिपक्यांवर क्लिक करा. पुढे सेटिंग्जवर टॅप करून घ्या.
पुढे IOS स्क्रीनच्या खाली उजव्या बाजूला सेटिंगवर पाहू शकता.
पुढे टुल्समध्ये मेटा व्हेरिफाइडवर क्लिक करा.
मेटा व्हेरिफायड पर्याय निवडल्यानंतर, सबस्क्रिप्शन पॅकेज निवडा आणि नंतर पेमेंट करा. ब्लू टिकसाठी ६३९ रुपये ते १८९०० रुपये रक्कम लागू शकते.