Mercedes-Benz Maybach EQS 680 Saam Tv
बिझनेस

मुंबई ते गोवा एका चार्जमध्ये गाठणार! 31 मिनिटांत होते चार्ज, 11 एअरबॅग; जबरदस्त आहे 'ही' कार

Mercedes-Benz Maybach EQS 680: मर्सिडीज बेंझने भारतात आपली जबरदस्त कार Maybach EQS 680 लॉन्च केली आहे. याच कराची किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

जर्मन लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज बेंझने भारतात पहिली इलेक्ट्रिक Maybach EQS 680 लॉन्च केली आहे. ही एक सुपर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी यात 11 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. याच कारच्या फीचर्स, रेंज आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

किती आहे किंमत?

ही देशातील पहिली इलेक्ट्रिक Maybach एसयूव्ही EQS680 आहे याची डिझाइन आणि फीचर्स याला इतर सर्वांपेक्षा वेगळं बनवतात. याची केबिन सुपर लक्झरी आहे. मर्सिडीजच्या या इलेक्ट्रिक मेबॅकची भारतात एक्स-शोरूम किंमत 2.25 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ही कार जागतिक स्तरावर सादर करण्यात आली होती.

Mercedes Benz च्या नवीन EQS 680 Maybach इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. यात एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत. यात Ambient Lights देण्यात आले आहे. जे केबिनला प्रीमियम फील देण्यास मदत करतात.

कारमध्ये 15 स्पीकर बर्मेस्टर आणि 4D सराउंड साउंड सिस्टम ग्राहकांना मिळेल. याशिवाय यात लेदर सीट्स, इन्फोटेनमेंट कंट्रोल्स, मागील सीटवर स्क्रीन, 360 डिग्री कॅमेरा, चारही सीटसाठी व्हेंटिलेटेड सीट्स, 21 इंच अलॉय व्हील, दोन पॅनोरमिक सनरूफ आहेत.

Mercedes-Benz Maybach EQS 680

किती आहे रेंज?

EQS 680 Maybach मध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्ससह 107.8 kWh क्षमतेची बॅटरी आहे. यात बसवलेली मोटर 658bhp पॉवर आणि 950Nm टॉर्क जनरेट करते. ही कार एकदा संपूर्ण चार्ज केल्यावर 611 किलोमीटरची रेंज देऊ शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे. 0 ते 100 किमी प्रतितास वेग प्राप्त करण्यास या कारला 4.4 सेकंद लागतात. ही कार 220kW फास्ट चार्जरने 31 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते. सेफ्टीसाठी यात 11 एअरबॅग, लेव्हल-2 ADAS, अँटी-लॉक ब्रेक सिस्टम, EBD आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT