Mercedes-Benz EQS Saam Tv
बिझनेस

मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये गाठते! 31 मिनिटात होते चार्ज, जबरदस्त आहे 'ही' इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत

Mercedes-Benz EQS: Mercedes-Benz EQS ही जबरदस्त कार असून यात फ्युचरिस्टिक लूकसह ग्राहकांना जबरदस्त रेंज मिळेल. याच कारच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

भारतात इलेक्ट्रिक कारची क्रेज वाढताना दिसत आहे. यातच जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. तुम्हीही जर लक्झरी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आम्ही ज्या इलेक्ट्रिक कारबद्दल बोलत आहोत ती आहे 'मर्सिडीज-बेंझ ईक्यूएस'. याच इलेक्ट्रिक कारच्या फीचर्स, रेंज आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

मर्सिडीज-बेंझने अलीकडेच आपली नवीन EQS SUV भारतात सादर केली आहे. सामान्य लक्झरी इलेक्ट्रिक कार्सपेक्षा ही खूपच वेगळी आणि खास आहे. याची डिझाइन हा एक मोठा प्लस पॉइंट आहे. याच्या फ्युचरिस्टिक डिझाइनमुळे ही कार लोकांना आकर्षित करत आहे.

नवीन EQS SUV समोर आणि मागील बाजूस एलईडी लाइट बारसह एलईडी हेडलॅम्पसह येते. यात समोरील बाजूस LED टेललाइट्स आणि EQS बॅजिंग आहे. या कारमध्ये फ्लश-फिटिंग डोअर हँडल, ब्लँक-ऑफ ग्रिल, ड्युअल-टोन व्हील आहेत. डिझाइन आणि केबिनच्या दृष्टीने ही एक जबरदस्त ईव्ही आहे.

17.7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

नवीन EQS SUV च्या केबिनबद्दल बोलायचे झाले तर MBUX हायपर स्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय यात 3-स्पोक स्टीयरिंग व्हील, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, फ्री-स्टँडिंग 12.3-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आणि 17.7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. याचा आतील भाग अतिशय प्रिमियम आणि आलिशान आहे.

किती आहे किंमत?

या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD, 9 एअरबॅग्ज आणि लेव्हल 2 ADAS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यात 5 जणांच्या बसण्याची जागा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स-शो रूम किंमत 1.41 कोटी रुपये आहे.

किती देते रेंज?

नवीन EQS SUV ला 122kWh बॅटरी पॅक मिळतो जो दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह जोडलेला आहे. ही कार एकदा फुल चार्ज झाली की809 किमीची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच तुम्ही ही कार एकदा फुल चार्ज केली की, मुंबई ते नागपूर सहज प्रवास करता येईल. याच्या 200kW फास्ट चार्जरच्या मदतीने, ही कार फक्त 31 मिनिटांत 10-80% पर्यंत चार्ज होऊ शकते. ही कार 4.7 सेकंदात 0-100km चा वेग पकडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT