Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: एमबीए केलं, बँकेत ऑफिसर म्हणून काम, फुल टाइम नोकरी करत UPSC क्रॅक; IAS स्तुति चरण आहेत तरी कोण?

Success Story Of IAS Stuti Charan: आयएएस स्तुति चरण यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी बँकेत नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि त्यात यशदेखील मिळवलं.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन प्रशासकीय सेवेत रुजू होता येतं. यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. परंतु फक्त काही जणांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते. परंतु किती अपयश आलं तरीही त्यावर मात करायची असते. असंच काहीसं आयएएस ऑफिसर स्तुति चरण यांनी केलं. त्यांनी सलग दोनदा अपयश आले तरीही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

स्तुति यांनी फुल टाइम नोकरी करत यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. त्यांनी खूप कमी वयात यश मिळवलं आहे. स्तुती या नेहमीच त्यांच्या दमदार कामामुळे चर्चेत असतात.

स्तुती चरण या मूळच्या राजस्थानच्या जोधपूरच्या रहिवासी. त्यांनी भिलवाडा येथून विवेकानंद केंद्र विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लाचू मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीमधून ग्रॅज्युएशन केले. यानंतर त्यांनी आयआयपीएम मधून पर्सनल अँड मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स केला.

यानंतर स्तुति या बँकेत नोकरीला लागल्या. त्या युको बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी फुल टाइम नोकरी करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी खूप मेहनत आणि मन लावून अभ्यास केला. त्यांनी २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी परीक्षेत तिसरी रँकदेखील मिळवली होती.

स्तुति यांनी मेहनत आणि स्ट्रॅटेजीचा वापर करुन यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांनी वेळेचा सदुपयोग केला. याचसोबत सतत मेहनत केली.त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी असतानाही यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांच्या या टाइम मॅनेजमेंटमुळेच त्यांना यश मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT