मारुती सुझुकी कंपनी नवी कार बनवत आहे. या कार भारतीय ग्राहकांच्या आवडीच्या आणि त्यांच्या गरजेला उपयोगी पडतील अशा पद्धतीच्या कारची निर्मिती केली जात आहे. कंपनी भारतात आपले पोर्टफोलिओ वाढवणार आहे. त्याचवेळी कंपनी कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये ३ नवीन वाहनांवर देखील काम करत आहे. मारुती सुझुकी २०२४-२०२५ दरम्यान नवीन कार लॉन्च केल्या जातील. (Latest News)
New-Gen Maruti Suzuki Swift
मारुती सुझुकीच्या नवीन जेन स्विफ्टचे गेल्या वर्षी अनावरण करण्यात आले. हे वाहन येत्या काही महिन्यांत अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह भारतात लॉन्च केले जाऊ शकते. या कारमध्ये अनेक नवीन फिचर्स आणि तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. कॉम्पॅक्ट कारमध्ये 1.2L Z सीरीज इंजिन दिले जाऊ शकते.
New-Gen Maruti Suzuki Dzire
मारुती सुझुकीच्या आगामी कारच्या यादीत सुझुकी डिझायरचेही नाव आ्हे. लवकरच भारतीय बाजारपेठेत ही कारही लॉन्च केली जाणार असल्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत निर्मात्याकडून सीएनजी पर्यायासह लॉन्च केले जाण्याची अपेक्षा आहे. ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी सेडान आहे. कंपनी नवीन डिझायरमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्ये समाविष्ट करू शकते. हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 1.2L Z सीरीज पेट्रोल इंजिनसह पाहिले जाऊ शकते.
Maruti Suzuki Fronx Facelift
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. निर्मात्याकडून हे फेसलिफ्ट आवृत्ती म्हणून लॉन्च केले जाऊ शकते. पुढील वर्षी भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यामध्ये पॉवर देण्यासाठी 1.2L Z सीरीजचे पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. मात्र या कारविषयी अधिकची माहिती कोणतीच दिलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.