Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: नवरा अन् सासरच्यांकडून मारहाण; ७ वर्षाच्या लेकीला घेऊन माहेरी आली; UPSC परीक्षा दिली; IAS शिवांगी गोयल यांचा प्रवास

Success Story Of IAS Shivangi Goel: शिवांगी गोयल यांचे वैवाहिक जीवन खूप खडतर परिस्थितीत गेले. त्यांना सासरच्या लोकांनी खूप मारहाणदेखील केली होती. परंतु त्यांनी खूप कठीण परिस्थितीतून मार्ग काढला.

Siddhi Hande

दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षा देतात. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस आणि आयपीएस अधिकारी होण्याची अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकदा संघर्ष करावा लागतो. असाच संघर्ष शिवांगी गोयल यांनी केला आहे. त्यांनी खूप कठीण परिस्थितीत यूपीएससी परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवले. (Success Story)

शिवांगी या मूळच्या उत्तर प्रदेशच्या रहिवासी. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला. लग्नानंतर त्यांना सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला. परंतु त्यांनी तरीही हार मानली नाही या परिस्थितीवर मात केली.

शिवांगी लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांनी लग्नाआधीही दोनदा यूपीएससी परीक्षा दिली होती. परंतु त्यांना दोन्ही वेळा यश मिळाले नाही. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मारहाण केली. शिवांगी यांना एक मुलगी आहे.मुलीच्या जन्मानंतरदेखील त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना त्रास देणे कमी केले नाही. (Success Story Of IAS Shivangi Goyal)

यानंतर शिवांगी या आपल्या माहेरी आल्या. त्या आपल्या ७ वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी आल्या.त्यांनी आपल्या वडिलांचा सल्ला घेऊन पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी २०२१ मध्ये तिसऱ्या अटेंप्टमध्ये १७७ रँक मिळवली. त्या आयएएस अधिकारी झाल्या.

शिवांगी यांना वैवाहिक जीवनात खूप संघर्ष करावा लागला. यामुळे त्या खूप खचल्या होत्या. परंतु त्यांनी आपल्या मुलीचे आयुष्य बदलण्यासाठी एक निर्णय घेतला आणि त्यात यशदेखील मिळाले. शिवांगी यांनी आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला. आज त्या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg For Diabetes: डायबिटीज असणाऱ्यांनी अंडी खावी की नाही? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खासदार-आमदारांची पळवापळवी! २०२२ पासून १११ नेत्यांनी बदलला पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; आकडेवारी पाहून चक्रावून जाल

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी; एकाचवेळी किती पैसे मिळणार?

Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

SCROLL FOR NEXT