Government new decision on vehicle number plates to stop toll theft saam tv
बिझनेस

Toll Rules : टोल चोरीला बसणार कायमचा चाप, नंबर प्लेटबाबत सरकारचा मोठा निर्णय

Number plate rules : महामार्गावरील टोल चोरी रोखण्यासाठी सरकारने आता वाहनांच्या नंबर प्लेटबाबत कठोर पाऊल उचलले असून लवकरच नवीन नियम लागू केले जाणार आहेत.

Saam Tv

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टोल टॅक्स भरणे टाळण्यासाठी काही वाहनचालक आपल्या गाडीची नंबर प्लेट लपवणे, किंवा नंबर स्पष्ट दिसणार नाही अशी व्यवस्था करतात. मात्र आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याच्या तयारी केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

नंबर प्लेट लपवल्यास 4 ते 8 पट टोल आकारला जाण्याचा प्रस्ताव

प्रस्तावित नियमानुसार, टोल भरणे टाळण्यासाठी वाहनाची नंबर प्लेट लपवली किंवा तिच्याशी छेडछाड केली, तर संबंधित वाहनचालकाकडून नियमित टोलच्या 4 ते 8 पट रक्कम वसूल केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या टोल प्लाझावर सामान्य टोल 100 रुपये असेल, तर अशा प्रकारच्या नियमभंगासाठी 400 ते 800 रुपये भरावे लागू शकतात. तर 150 रुपये टोल असलेल्या ठिकाणी ही रक्कम 600 ते 1,200 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांवर नजर ठेवली जाणार

तसेच, वाहनांनवरील होणऱ्या नंबरप्लेटवरील छेडछाडीला रोखण्यासाठी टोल प्लाझावर अत्याधुनिक कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर AI आधारित यंत्रणा वापरण्याची तयारी सुरू केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने नंबर प्लेट लपवणाऱ्या,किंवा तिच्यात बदल करणाऱ्या वाहनांची ओळख पटवली जाणार आहे. त्यामुळे टोल चुकवण्यासाठी नंबर प्लेटसोबत केलेली कोणतीही हुशारी सहज पकडली जाऊ शकते.

टोलच्या अतिरिक्त कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते

मोटार वाहन कायद्यानुसार नंबर प्लेटशी छेडछाड करणे हा नियमभंग आहे. यासाठी पहिल्या वेळी 5 हजार रुपये, तर पुन्हा नियमभंग केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. हा दंड प्रस्तावित अतिरिक्त टोल आकारणीपेक्षा वेगळा असेल.

वाहनचालकांनी काय काळजी घ्यावी?

  • वाहनाची नंबर प्लेट नेहमी स्पष्ट आणि वाचता येण्यासारखी ठेवा.

  • नंबर प्लेटवर स्टिकर किंवा इतर वस्तू लावू नका.

  • ती वाकवणे किंवा झाकणे टाळा.

  • नंबर प्लेट तुटली किंवा खराब झाली असल्यास तातडीने बदलून घ्या.

4 ते 8 पट टोल आकारण्याचा नियम सध्या प्रस्तावित असून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांनी प्रस्ताव आणि लागू झालेला नियम यातील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cold Ears in Winter : थंडीच्या दिवसांत कान का दुखतात? पटकन करा 'हे' घरगुती उपाय, गंभीर आजारांपासून होईल बचाव

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये आवादा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक

हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असणारी काद्यांच्या पातीची भाजी कशी बनवायची?

Badlapur : बदलापुरात लखनऊ पॅटर्न, भटक्या श्वानांसाठी उभारलं जाणार शेल्टर, नेमकं काय केलं जाणार?

Microwave Placement: किचनमध्ये मायक्रोवेव्ह कोणत्या दिशेला ठेवावा? चुकीच्या ठिकाणी ठेवणं पडेल महागात, वास्तूनुसार जाणून घ्या योग्य दिशा

SCROLL FOR NEXT