महिंद्राने नवीन M12Electro Formula E कार लाँच केलीये
महिंद्रा रेसिंगची गेल्या 12 वर्षांत Formula E मध्ये उत्तम कामगिरी
M11Electro कारमुळे टीमला मागील सीझनमध्ये मिळालं चौथं स्थान
महिंद्रा टीमने आज बुधवारी फॉर्मूला रेसिंग ई-कार बाजारात लाँच केली आहे. M12Electro ही रेसिंग कार M11Electro चे अपडेट मॉडेल आहे. नवी रेसिंग कार नव्या फिचर्ससह हाय-परफॉर्मेन्स देणारी आहे. यंदाच्या १२ व्या सीझनमध्ये पोडियम मिळवण्याचा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत टॉप-5 स्थान कायम राखण्याचा मानस ठेवला आहे. यंदाच्या सीझनमध्ये 'वन टू वॉच' म्हणून ओळख अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट या कारच्या लाँचिग मागे आहे.
महिंद्रा रेसिंगने मागच्या सीझनमध्ये फॉर्मूला ई चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यांनी या स्पर्धेत चौथं स्थान मिळवलं होतं. यंदा होणाऱ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. महिंद्रा रेसिंगने गेल्या 12 वर्षांत ABB FIA फॉर्म्युला ई रेसिंगमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या कालावधीत संघाने पाच ई-प्रिक्स विजय, 29 पोडियम फिनिश, 11 पोल पोझिशन्स आणि 1,000 हून अधिक चॅम्पियनशिप गुणांची कमाई केलीये.
महिंद्रा रेसिंगचा हा प्रवास किमान 2030 पर्यंत सुरू राहणार आहे गेल्या काही महिन्यांत सीईओ आणि टीम प्रिन्सिपल फ्रेडरिक बर्ट्रांड यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा रेसिंग खालच्या स्थानावरून वर पोहोचली. कंपनीच्या M11Electro कारची ड्रायव्हर जोडी निक द व्ह्रिस आणि एदोआर्दो मॉर्टारा यांनी या कारच्या मदतीने सीझन 11 मध्ये मिळून पाच पोडियम फिनिश मिळवले. त्याच जोरावर महिंद्रा रेसिंगने ABB FIA फॉर्मूला ई-वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानावर उत्तम कामगिरी केली.
तत्पूर्वी, टीमने M11Electro चं अपडेट मॉडेल म्हणून M12Electro ही नवीन कार लाँच केली. या कारच्या मदतीने येत्या सीझनमध्ये नियमित पोडियम मिळवण्याचं आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये टॉप-5 स्थान टिकवण्याचे टीमचे उद्दिष्ट आहे.
गेल्या वर्षी महिंद्राने XEV 9e आणि BE 6 या दोन इलेक्ट्रिक ओरिजिन SUV सादर करताच भारतातील ईव्ही चर्चा बदलून टाकलीये. एका वर्षातच या गाड्यांना 4 अब्जांहून अधिक व्यूज मिळाले आणि 30,000 युनिट्सची विक्री होत नवा विक्रम झालाय. 80% ग्राहक प्रथमच महिंद्राची गाडी घेताहेत. 65% वाहनं दररोज वापरली जात आहेत. हजारो गाड्यांनी 20,000 ते 50,000 किमीचा टप्पा पार केलाय. लेहपासून थारपर्यंत BE 6 आणि XEV 9e यांनी दमदार परफॉर्मन्स दिलाय. BE 6 गेमिंग आणि पॉप कल्चरमध्येही लोकप्रिय ठरताहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.