Mahila Samruddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Mahila Samruddhi Yojana: लाडक्या बहिणींना मिळणार २५०० रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Delhi Government Mahila Samruddhi Yojana : दिल्ली सरकारने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेत महिलांना २५०० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

विविध राज्य सरकारने महिलांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ओडिशा सरकारने सुभद्रा योजना आणि मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना सुरु केली आहे. त्यानंतर आता दिल्ली सरकारदेखील लवकरच महिला समृद्धी योजना (Mahila Samruddhi Yojana) सुरु करणार आहे. या योजनेत महिलांना २५०० रुपये मिळणार आहे. याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, त्यांचे सरकार महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी काम करत आहे. लवकरच शहरातील पात्र महिलांना २५०० रुपये देणार आहे. यामध्ये एकच समस्या अशी आहे की, गेल्या १२-१४ वर्षात दिल्लीत एकही नवीन रेशन कार्ड जारी करण्यात आले नाही. त्यामुळेच कोणत्याही कल्याणकारी योजनेत नवीन लाभार्थी जोडता आले नाहीत.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही योजना पूर्णपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जेणेकरुन रेशन कार्ड नसलेल्या पात्र लोकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना अंमलात आणण्यासाठी काम सुरु आहे. लवकरच ही योजना सुरु केली जाईल.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपने नागरिकांना आश्वासन दिले होते. जर भाजप सरकार आले तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना २५०० रुपये दिले जातील. याबाबत त्यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे. दिल्ली सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या योजनेच्या अंबलबजावणीसाठी ५१०० कोटी रुपयांचा निधी आधीच मंजूर केला आहे. त्यानंतर ही योजना लागू करण्यासाठी दिल्ली सरकार प्रयत्नशील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Yavatmal Politics: ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी; काय आहे प्रकरण?

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

टॉयलेटमध्ये तासनतास फोन घेऊन बसल्याने होऊ शकतात 'या' आरोग्याच्या समस्या

Maharashtra Live News Update : महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT