Kanyadan Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: मुलीच्या लग्नाची चिंता मिटली! लेकीच्या लग्नासाठी राज्य सरकार देतंय २५ हजार रुपये; जाणून घ्या

Kanyadan Scheme: प्रत्येक आई-वडिलांना आपल्या लेकीच्या लग्नाची चिंता असते. लेकीच्या लग्नाच्या खर्चासाठी ते खूप आधीपासून बचत करतात. त्यामुळेच राज्य सरकार आता लेकीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक आई वडिलांना आपल्या लेकीच्या लग्नाची काळजी असते. लेकीचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात व्हावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी मुलीचे आई-वडिल खूप आधीपासूनच आर्थिक बचत करतात. मुलींच्या लग्नाचा अवाजवी खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारची कन्यादान योजना मदत करते. लेकीच्या लग्नासाठी आईवडिलांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेत नवदाम्पत्याला २५ हजार रुपयांची मदत मिळते.

कन्यादान योजना राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत दिली जाते. अनुसूचित जाती, भटक्या जमाती आणि विशाष मागासवर्गीय प्रवर्गातील वेगवेगळ्या जाती जमाती असलेल्या लोकांसाठी ही योजना आहे. या प्रवर्गातील लोकांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मागासलेपण कमी करुन त्यांना समाजात वेगळे स्थान मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना मागासवर्गीय लोक, भटक्या जमातीतील नवविवाहित दाम्पत्यासाठी लागू होते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलाचे वय २१ तर मुलीचे वय १८ असणे अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहं. वधू- वरांच्या पहिल्या लग्नासाठीच ही मदत मिळणार आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी नवरा आणि बायको दोन्ही किंवा त्यांच्यापैकी एक जण मागासवर्गीय जाती, जमातींचा असायले हवे, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेअंतर्गत सरकार २० हजार ते २५ हजार रुपयांची मदत करते. या योजनेत जोडप्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणे गरजेचे आहे. सामुदायिक विवाहसोहळ्यात १० जोडपे असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : माझं कोकण भारी! थंडीत 'या' ठिकाणी पिकनिक प्लान करा

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

SCROLL FOR NEXT