Pratap Sarnail bough Tesla google
बिझनेस

First Tesla Car in India: देशात पहिल्या टेस्ला कारची डिलिव्हरी, महाराष्ट्राच्या 'या' मंत्र्यानी विकत घेतली कार

Pratap Sarnaik Bought First Tesla car In India: टेस्लाने १५ जुलै रोजी मुंबईतील बांद्र- कुर्ला कॉम्पलेक्स (BKC) मध्ये भारतातला पहिला शोरुम लॉंच केला होता. आज, टेस्लाने भारतात पहिल्या कारची डिलिव्हरी देखील केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने काही दिवसापूर्वी बांद्र- कुर्ला कॉम्पलेक्स, मुंबई येथे टेस्लाचे भारतातील पहिल्या शोरुमची सुरुवात केली. आज कंपनीने भारतीय बाजारात आपली पहिली कार 'Tesla Model Y'च्या पहिल्या युनिटची डिलिव्हरी देखील केली आहे. कंपनीने या कारची डिलिव्हरी मुंबईतील टेस्ला एक्सपीरिंयस सेंटर येथून केली. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या पहिल्या टेस्ला कारचे मालक बनले आहेत. त्यांनी शोरुम सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच कार बुकिंग केली होती. सरनाईक यांनी टेस्लाच्या अधिकृत आउटलेटमधून कारची डिलिव्हरी घेतली आहे.

प्रताप सरनाईकांनी खरेदी केली पहिली टेस्ला कार

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक टेस्ला मॉडेल वायची डिलिव्हरी घेताना म्हणाले की, ही खरेदी केवळ वैयक्तिक नाही तर महाराष्ट्राच्या हरित महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. ते म्हणाले, "नागरिकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मी टेस्लाची डिलिव्हरी घेतली आहे. मी ही कार माझ्या नातवाला भेट देणार आहे जेणेकरून त्याला लहानपणापासूनच पर्यावरणासाठी अनूकूल वाहतुकीचे महत्त्व समजेल.तसेच महाराष्ट्रात पुढच्या १० वर्षात इलेक्ट्रीक कारच्या दिशेमध्ये मोठा बदल घडताना दिसेल.

प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (MSRTC) आपल्या ताफ्यात सुमारे 5,000 इलेक्ट्रिक बसेस जोडल्या आहेत. तसेच संपूर्ण राज्यात चार्जिंग स्टेशन देखील बनवले जात आहे. राज्याने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आधीच अनेक उपक्रम सुरू केली आहेत. सरकारने इलेक्ट्रीक वाहनांना अटल सेतू आणि समृद्धि महामार्गावर टोल सूट दिली आहे.

Tesla Model Yचे फिचर्स

Tesla Model Y ला दोन व्हेरिएंट स्टॅडंर्ड आणि लॉंग रेंज व्हेरिएंटमद्ये लॉंच करण्यात आले आहे. स्टॅंडर्ड व्हेरिएंटची किंमत ५९.८९ लाख रुपये आहे तर लॉंग रेंज व्हेरिएंटची किंमत ६७.८९ लाख रुपये आहे. ही कार दोन वेगवेगळ्या (60 kWh आणि 70 kWh) बॅटरी पॅक सोबत येते. 60 kWhची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ५०० किलोमीटरची ड्राइव्हिंग रेंज देते. तर लॉंग रेंज व्हेरिएंट ६२२ किलोमीटर ची ड्राइव्हिंग रेंज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT