Ladki Bahin Yojana eKYC update Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ₹४५००; 'हे' आहे कारण, वाचा लेटेस्ट अपडेट

ladki Bahin Yojana February Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांचे मिळून ₹४५०० जमा होण्याची शक्यता आहे. मात्र ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य असून अपात्र महिलांचा लाभ बंद होणार आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana ₹4500 installment release date Maharashtra : राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महिलांच्या खात्यात आता एकाच वेळी साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे वितरित केला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. जानेवारी २०२६ नंतर 'लाडकी बहीण' योजनेचा एकही हप्ता जमा झालेला नाही. मात्र, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या हप्त्यांचे वितरण केले जाईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत पात्र महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होतील. एप्रिल महिन्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांचा एकत्रित लाभ मिळेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

ई-केवायसी अनिवार्य; अपात्र महिलांचा लाभ बंद

जुलै २०२४ पासून राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. मात्र, सरकारने आता ई-केवायसी अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांचे अर्ज बाद झाले आहेत, तर काही अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. ज्या महिलांच्या अर्जात किंवा ई-केवायसीमध्ये त्रुटी आहेत, त्यांना ३१ जुलैपर्यंत चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा १५०० रुपयांचा लाभ कायमचा बंद होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

त्यांनाच ₹१५०० चा लाभ मिळणार

ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा १५०० चा लाभ मिळणार नाही. त्याशिवाय चारचाकी गाडी घरात असेल तरीही योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक महिलांना अपात्र असतानाही लाभ घेतला. पण आता ‘ई-केवायसी’नंतर अनेकांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. ज्या महिलांच्या खात्यावर आता पैसे येणार नाहीत, त्यांचा १५०० रूपयांचा लाभ कायमचा बंद झाला असे समजावे, असे म्हणाले.

Ladki Bahin Yojana February Installment Date

१५०० की ४५०० खात्यावर किती रूपये येणार -

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर १५०० येणार की ४५०० येणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी वितरित केला जात आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून २७७ कोटी रुपये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास शासन मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही दिवसात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. पण एकत्र ४५०० येणार की फक्त फेब्रुवारी महिन्याचे १५०० येणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील ४ दिवसात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

High Blood Pressure : उन्हाळ्यात हाय BP कसा कंट्रोल कराल? ‘या’ टिप्स ठरतील रामबाण उपाय

Sahar Sahikh: सहर शेख म्हणते 'गेम ओव्हर', बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात कुणाचा गेम?

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६' च्या विजेत्याला किती मिळणार पैसा, 'हा' स्पर्धक उचलणार ट्रॉफी?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT