Sanjay Gandhi Niradhar Yojana Saam Tv
बिझनेस

Sanjay Gandhi Niradhar Yojana: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; वाचा सविस्तर

Sanjay Gandhi Niradhar Yojana Benefits: महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार योजना सुरु केली आहे. या योजनेत राज्यातील दुर्बल घटकातील नागरिकांना आर्थिक मदत केली जाते.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची संजय गांधी निराधार योजना

दुर्बल घटकांना केली जाते आर्थिक मदत

दिव्यांग नागरिकांना मिळतात २५०० रुपये

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारनेही अनेक योजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना सुरु केली आहे. या योजनेत समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत केली जाते. त्यांना दर महिन्याला पैसे दिले जातात.

संजय गांधी निराधार योजनेत आतापर्यंत हजारो नागरिकांनी लाभ घेतला आहे. मागच्या आर्थिक वर्षात यवतमाळमधील ५०८६ अर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर या नागरिकांना दर महिन्याला पैसे देण्यात आले आहेत.

संजय गांधी निराधार योजनेत समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, परित्यक्ता, देवदासी, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखांच्या पत्नीला, ३५ वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री यांना लाभ मिळतो.

या योजनेत अर्ज मंजूर झाल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जातात. सर्वसामान्य नागरिकांना दर महिन्याला १५००रुपये दिले जातात. या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करायचा आहे. जवळच्या सेतू केंद्रात जाऊनदेखील अर्ज करु शकतात. आपले सरकार या ऑनलाइन पोर्टलवरदेखील अर्ज करण्याची सुविधा आहे.

आवश्यक कागदपत्रे

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताना अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, १५ वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे, विधवा महिलांना पतीच्या मृत्यूचा दाखला, दिव्यांग व्यक्तींना जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला, अनाथ दाखला, दुर्धर आजार दाखला, उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. जर दिव्यांग असेल तर त्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार असायला हवे. इतर लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा २१००० रुपये निश्चित करण्यती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदीदारांना मोठा झटका! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; पाहा तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

SCROLL FOR NEXT