महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. याचसोबत या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.या मोफत सिलिंडर वितरणाला आता सुरुवात झाली आहे. पात्र महिलांना मेसेज आल्यानंतरच मोफत सिलिंडर मिळणार आहे. ज्या महिलांना या योजनेअंतर्गत मेसेज आला नाही त्यांनी काय करावे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत ज्या महिलांना मोफत गॅस सिलिंडर मिळाला नाही. त्यांना आता गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. गॅस सिलिंडर वितरण प्रक्रिया सुरु केलेली आहे. त्यामध्ये महिलांना अगोदर गॅस सिलिंडर विकत घ्यायचा आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात गॅस सिलिंडरची रक्कम दिली जाणार आहे. (Mukhyamantri Annapurna Yojana)
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोफत गॅस सिलिंडरचा हप्ता जमा झालेला आहे. या योजनेत ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला गॅस सिलिंडरचे पैसे मिळणार आहेत. (Women Will Get 3 Cyliner Free)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.