Maharashtra ITI AI Training meta ai
बिझनेस

राज्य सरकारचं विद्यार्थ्यांसाठी खास गिफ्ट, २६ हजार तरूणांना होणार फायदा, वाचा नेमका काय आहे प्लान

Drone Technology Training For Students : महाराष्ट्रातल्या आयटीआय विद्यार्थ्यांना आता एआय, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना फक्त पारंपरिक शिक्षण देऊन चालणार नाही, तर भविष्यातल्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन त्यांना आधुनिक कौशल्यांचं प्रशिक्षण देणंही महत्त्वाचं आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

आता राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ड्रोन टेक्नॉलॉजी आणि सायबर सुरक्षेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळणार आहेत. त्यामुळे तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हायला मदत होणार आहे.

राज्यातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने 'संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम'सुरू केला. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत आहे. त्यामुळे कंपन्यांना नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. हीच गरज ओळखून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला.

२६ हजार ५२० युवकांसाठी प्रशिक्षणाची क्षमता

तर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या युवकांसाठी एकूण २६ हजार ५२० प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध करून देण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे, आतापर्यंत १८ हजार २६६ प्रशिक्षणार्थींनी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे आधुनिक कौशल्ये शिकण्याकडे तरुणांचा कल वाढत असल्याचे दिसून येतो.

कोणते आधुनिक तंत्रज्ञान शिकायला मिळणार?

तर या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ड्रोन तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा यांसारख्या आधुनिक क्षेत्रांचे प्रशिक्षण दिले जाईल. या कौशल्यांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं सोपं होईल. एकूणच, आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. पारंपरिक व्यावसायिक शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळाल्यामुळे युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधींचे दरवाजे खुले होऊ शकतात. त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाकडे राज्यातल्या तरुणांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सीईओ जितेंद्र मिश्रा यांची साई संस्थानला भेट

Snake Facts: मुंगूसच नाही! सापाच्या विषाचा 'या' ५ प्राण्यांवर होत नाही परिणाम; नावं ऐकून व्हाल थक्क

Bike Engine Warm Up: थंडीत बाईक स्टार्ट केल्यानंतर किती वेळ थांबावं? इंजिन गरम करणं का गरजेचं जाणून घ्या

Elections 2027 : देशातील सर्वात मोठ्या राज्यातील निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधी? महत्त्वाची अपडेट आली समोर

प्रसिद्ध ध्रुव राठी यांच्या अडचणी वाढल्या!; न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी,काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT