Shruti Vilas Kadam
साप म्हटलं की अनेकांना भीती वाटते. साप चावल्यास त्याच्या विषामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, जगात असे काही प्राणी आहेत, ज्यांच्यामध्ये सापाच्या विषाचा सामना करण्याची नैसर्गिक क्षमता असते.
मुंगुसाच्या शरीरावर सापाच्या विषाचा परिणाम होत नाही. मुंगुसाच्या शरीरातील नर्व्ह सेल रिसेप्टर्समदील विशेष बदलांमुळे सापाच्या विषाचा त्याच्या चेतासंस्थेवर कोणताही परिणाम होत नाही.
हनी बॅजर हा प्राणी प्रामुख्याने आफ्रिकेत आढळतो. याची त्वचा जाड आणि सैल असते. त्यामुळे सापाने चावा घेतल्यास त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. हा प्राणी ब्लॅक मांबासारख्या विषारी सापांशीही लढतो.
सेक्रेटरी बर्ड हा आफ्रिकेत आढळणारा मोठा पक्षी आहे. त्याचे पाय लांब आणि मजबूत असतात. तो आपल्या पायांनी सापाला जोरदार लाथ मारतो आणि त्याला पकडून खातो. त्यामुळे हा पक्षी सापांची शिकार करण्यात तरबेज आहे.
किंग स्नेक हा स्वतः विषारी नसतो. मात्र, तो इतर विषारी सापांना खातो. रॅटलस्नेकसारख्या सापांनाही तो आपले भक्ष्य बनवतो. त्याच्या शरीरात सापाच्या विषाचा सामना करण्याची नैसर्गिक क्षमता असते.
हेजहॉग हा छोटासा काटेरी प्राणी आहे. त्याच्या संपूर्ण पाठीवर छोटे-छोटे काटे असतात. या काट्यांमुळे तो शत्रूंपासून स्वतःचे संरक्षण करतो. तसेच काही सापांच्या विषाचा सामना करण्याची क्षमताही त्याच्यामध्ये असते.
परेंटी मॉनिटर ही ऑस्ट्रेलियात आढळणारी मोठी पाल आहे. तिचे शरीर मजबूत असून ती वेगाने हालचाल करू शकते. ही पाल लहान सापांची शिकार करते. विषारी सापांनाही ती आपले भक्ष्य बनवू शकते.