FESTIVE SEASON INFLATION saam tv
बिझनेस

ऐन सणासुदीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन महागलं; गॅसचा भडका, टोलच्या दरातही वाढ

Festive Season Inflation Shock: दुष्काळानंतर आता राज्यातील नागरिकांवर महागाईची टांगती तलवार आहे. ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच महागाईची झळ जाणवू लागलीये. ऐन सणासुदीत खिशाला कात्री लागली असून कोण-कोणत्या गोष्टींवर दरवाढ झालीये?...

Rohit Kadam

राज्यावर दुष्काळाचं गंभीर संकट असताना दुसरीकडे महागाईचाही भडका उडालाय. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशांवर आर्थिक ताण पडणार आहे. कारण 1 ऑक्टोबरपासून अनेक वस्तू महागल्या आहेत. सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, याच वस्तूंच्या किंमती थेट 5 ते 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

इलेक्ट्रॉ़निक्स वस्तू महागल्या

एसी - 5 ते 8%

एसी प्रीमियम ब्रँड्स - 10%

LED TV आणि वॉशिंग मशीन

3 ते 4%

फ्रीज

3 ते 5%

तर दुसरीकडे, व्यावासायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आलीये... त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटंमध्ये खाणं महाग होणार आहे.

किती वाढ एकूण किंमत

71.50 रुपये 3,100.50 रुपये

19 किलो व्यावसायिक सिलिंडरचा दर 71.50 रुपयांनी वाढून 3,100.50 रुपये रुपयांवर गेलाय.

एव्हंढच नव्हे तर सणासुदीचा गोडवा देखील कमी होण्याची शक्यता आहेे. दसरा-दिवाळीच्या तोंडावरच साखरेचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

साखर 100 रुपयांवर का जाऊ शकते?

गेल्या वर्षीपेक्षा ओपनिंग स्टॉक 12 लाख टनांनी कमी

गेल्या वर्षीपेक्षा 19 लाख टन साखरेचं कमी उत्पादन होण्याची शक्यता

महाराष्ट्रात अल निनोमुळे तर उत्तर प्रदेशमध्ये लाल बुरशीमुळे उत्पादनाला फटका बसणार

कारखान्यांना मिळणारा सध्याचा साखरेचा दर उणे 4600 रुपये प्रति क्विंटल

इथेनॉलकडे ऊस वळवल्यास फटका बसण्याचा अंदाज

ब्राझीलमधील उत्पादनात घट झाल्यामुळे जागतिक बाजार प्रभावित होईल

तर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढीसह आता मुंबईत ये-जा करणेही प्रचंड महाग झालंय. मुंबईच्या वेशीवरील पाचही टोल नाक्यांवर अवजड वाहनांसाठी 20 टक्के दरवाढ करण्यात आलीये.

मुंबईत एन्ट्री महागली

आधी आता

मिनी बस - 75रु. 90रु.

ट्रक, बस - 150रु. 180रु.

अवजड वाहने -190रु. 225रु.

महत्त्वाचं म्हणजे, राज्यात भीषण दुष्काळामुळे संपूर्ण खरीप हंगाम हातून गेलाय. तर आगामी रब्बी हंगामासाठी आतापासून उपाय योजना केल्या जाताहेत. त्यातच आता महागाई नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. त्यामुळे दुष्काळाची जखम भळभळत असतानाच आता महागाईच्या दुष्टचक्रानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे शिक्षक मतदारांच्या यादीत अजब घोळ, मतदाराचं नाव 'बॉम्बस्फोट', वडिलांचं नाव 'बॉम्ब'

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT