PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतात ₹१२०००; पीएम किसानशिवाय या योजनेचा मिळतो लाभ

PM Kisan Yojana And Namo Shetkari Yojana 12000 Rupees Installment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो. या दोन्ही योजनेचे प्रत्येकी ६००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला मिळतात ६००० रुपये

पीएम किसान योजनेचे ६००० रुपये

नमो शेतकरी योजनेचे ६००० रुपये मिळतात

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी या योजनेचा लाभ दिला जातो. दरम्यान, याचसोबत शेतकऱ्यांसाठी विविध राज्य सरकारनेही योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेतदेखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.

राज्यातील शेतकऱ्यांना मिळतात ₹१२००० (Maharashtra Farmers Will Get 12000 Rupees)

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळतो. या योजनेतदेखील शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा की राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येतो.

राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे ६००० आणि नमो शेतकरी योजनेचे ६००० असे एकूण १२,००० रुपये मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. हे पैसे थेट डीबीटीगद्वारे तुमच्या खात्यावर जमा केले जातात.

पीएम किसान योजनेचे आतापर्यंत २२ हप्ते देण्यात आले आहेत. आता शेतकरी २३व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नमो शेतकरी योजनेचे ८ हप्ते जमा झाले आहेत. नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता येण्यास खूप उशिर झाला आहे. आता नववा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढचा हप्ता मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT