वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांना आनंदाची बातमी दिलीय. आगामी पाचही वर्षातील वीजदरात कपात करण्यात यावी असे एमईआरसी दिलाय. सुधारित वीजदर १ जुलैपासून लागू करण्याचे आदेशही आयोगाने दिलेत. दरम्यान किती युनिटपर्यंत ही वीज दर कपात करण्यात आलीय, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना लागलीय.
महावितरणने इतिहासात प्रथमच वीजदरात कपात करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मांडला होता. त्यानुसार आयोगाने आगामी पाचही वर्षात वीजदर कमी करण्याचा आदेश देण्यात आलाय. दरम्यान स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टीओडी सवलत देणे. तसेच सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन देणं ही या आदेशाची वैशिष्ट्ये आहेत.
महावितरणने नजिकच्या भविष्यातील विजेची गरज लक्षात घेत ‘रिसोर्स ॲडेक्वसी प्लॅन’ तयार केलाय. त्यानुसार २०३० पर्यंत राज्याची विजेची क्षमता ८१ हजार मेगावॅट होण्यासाठी ४५ हजार मेगावॅटचे वीजखरेदी करार केलेत. त्यापैकी ३१ हजार मेगावॅट वीज रिन्युएबल अर्थात नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांमधून मिळेल. ही वीज अत्यंत किफायतशीर दरात मिळणार आहे, त्यामुळेच आगामी पाच वर्षात महावितरणचे वीजखरेदीचे ६६ हजार कोटी रुपये वाचणार आहेत. या कारणामुळे महावितरणनं वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडला होता.
महावितरणचे १०० युनिट वीज वापर असणाऱ्या वीज ग्राहकांना दिलासा मिळालाय. नव्याने लागू होणाऱ्या वीज बिलामध्ये १ ते १०० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ०.५८ कमी दराने वीज मिळणार आहे. मात्र, १०१ ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ०.३४ रुपये अधिक दराने वीज बिल आकरले जाईल. तर ३०१ ते ५०० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांनाही अधिक बिल भरावे लागेल.
युनिट
१-१०० साठी आत्ताचे दर ६.२
नवीन दर - ५.७४
१०१- ३०० युनिटसाठी १२.२३
नवे दर १२.५७
३०१ ते ५०० युनिटसाठी
१६.७७
नवे दर - १६.८५
५०० पेक्षा जास्त युनिटसाठी
८.९३ दर आता आकारले जातात
नवे दर
१९.१५ असणार आहेत.
वीजदर कपातीमुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळलाय. यासह उद्योग, व्यवसायांना चालना मिळणार आहे. दरवर्षी औद्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात १० टक्के वाढ होत होती. त्याऐवजी आता पुढील पाच वर्षात या घटकांच्या वीजदरात कपात होणार आहे. ग्राहकांना किफायतशीर दरात दर्जेदार वीज पुरवठा करण्यास महावितरण वचनबद्ध असल्याचं महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.