LPG Gas Cylinders Rates Saam TV
बिझनेस

LPG Cylinder Price: दिवाळीत महागाईचा चटका, 'हा' सिलेंडर ६२ रुपयांनी महागला

LPG Price on 1 November 2024 : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा चटका बसणार असल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

LPG Gas Cylinder Rate 1 November 2024 : दिवळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसला आहे. आजपासून गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे, विशेष म्हणजे ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत झाली आहे. सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, मार्चपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. पण मागील चार महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत आहे.

ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये आजपासून पुन्हा वाढ केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ६२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. IOCL च्या संकेतस्थळानुसार, आजपासून ही वाढ लागू असेल.

LPG सिलेंडर महागला, बजेट कोलमडणार -

आज नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस.. व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ६२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमती ठरवल्या जातात. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ६२ रुपयांनी वाढ केली आहे. मुंबईमध्ये आता १९ किलो वजनाचा व्यवसायिक गॅस सिलेंडर 1754 रुपयांना मिळेल. तर दिल्लीमध्ये 1802, कोलकात्यामध्ये 1911.50 आणि चेन्नईमध्ये 1964 रुपयांना व्यवसायिक गॅस सिलेंडर मिळणार आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जैसे थे....

14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, मार्चपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. मुंबई ८०२, दिल्ली ८०३, कलकात ८२९, चेन्नई ८१८ रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT