Viral message claiming ₹2500 monthly allowance for unemployed found to be fake in fact check.
Viral message claiming ₹2500 monthly allowance for unemployed found to be fake in fact check.Saam Tv

बेरोजगारांना महिन्याला मिळणार 2500 रुपये? केंद्र सरकारची बेरोजगारांसाठी नवी योजना?

व्हायरल होत असलेल्या मेसेजची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता बेरोजगारांना केंद्र सरकार महिन्याला अडीच हजार रुपये देणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारची अशी योजना आहे का...? या दाव्याची आम्ही पडताळणी केली...
Published on

बेरोजगारांना आता केंद्र सरकार महिन्याला लाडकींसारखाच 2500 रुपयांचा हप्ता देणार असल्याचा दावा करण्यात आलाय...सोशल मीडियावर आता एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...पण, बेरोजगार म्हणजे त्यासाठी काय अटी आहेत...? वयाची अट काय...? खरंच केंद्र सरकारची अशी कोणती योजना आहे का...? असे प्रश्न उपस्थित होतात...ही योजना असेल तर गरजूंना खरंच आर्थिक फायदा होऊ शकतो...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

...हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी सरकारच्या वेबसाईट पाहिल्या...तसंच आमच्या टीमने अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

केंद्र सरकारची बेरोजगारी भत्ता योजना नाही

योजनेच्या नावाखाली लिंक आल्यास उघडू नका

वेबसाईटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका

पैशांचं आमिष दाखवून फसवण्याचा डाव आहे

केंद्र सरकारची कोणती योजना असेल तर http://myscheme.gov.in या अधिकृत साईटवर माहिती दिली जाते...तुम्हाला अशा मेसेजची लिंक आल्यास उघडून बघू नका...अधिकृत माहितीसाठी सरकारच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या...कारण, पैसे कमावण्यासाठी काही लोक बनावट वेबसाईट तयार करतात...आणि ऑनलाईन फॉर्म देऊन तुमची सगळी माहिती मिळवतात...यातूनच मोठी फसवणूक होऊ शकते...त्यामुळे अशा लिंकपासून सावध राहा...आमच्या पडताळणीत केंद्र सरकार बेरोजगारांना महिन्याला 2500 रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com