LPG New Rules GOOGLE
बिझनेस

LPG New Rules: LPG आणि PNG वापरणाऱ्यांसाठी नवे नियम; 'या' चुका केल्यास गॅस सिलेंडर मिळणे होईल बंद, आताच जाणून घ्या

LPG Update : सर्वसामान्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. तुम्ही नुकताच सिलेंडर बूक केला असेल तर पुढील महत्वाचा नियम जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला सिलेंडर दिला जाणार नाही.

Sakshi Sunil Jadhav

सर्वसामान्यांसाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही घरामध्ये इंडेन, भारत किंवा एचपीचे LGP कनेक्शन वापरत असाल तर काही गोष्टी समजून घ्या. कारण यामध्ये तेल कंपन्यांनी गॅस बुकींग, डिलीवरी आणि पाइप लाईन गॅस (PNG)या संदर्भात काही नवे नियम लागू केले आहेत. त्यात तुम्ही काही चुका केल्या असतील तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणं बंद होऊ शकतं.

दुसरा सिलेंडर लगेच मिळणार नाही

सरकारने सिलेंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी बुकींगचे दिवस वाढवले आहेत. त्यामध्ये पहिला बुक केलेला सिलेंडर मिळाल्यावर ४५ दिवसांनीच नवीन सिलेंडर बुक करता येईल. हा नियम ग्रामीण रहिवाशांसाटी आहे. तर शहरांमध्ये २५ दिवसांनी दुसरा सिलेंडर बूक करता येईल. हा नियम १४. २ किलोग्राम आणि ५ किलोग्राम अशा दोन्ही सिलेंडरला लागू होतो.

OTP शिवाय सिलेंडर मिळणार नाही

जर तुम्ही बूक केलेला बाटला ठरलेल्या दिवशी आला. तरीही तो तुम्हाला लगेच दिला जाणार नाही. तुम्हाला डिलीवरी बॉयला ओटीपी(OTP) द्यावाच लागेल. त्यामध्ये तुम्हाला सिलेंडर दिल्यावर रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. जो वन टाइम पासवर्ड असेल. तो तुम्हाला डिलीवरी बॉयला सांगायचा आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणं गरजेचं आहे.

पेट्रोल - डिझेलसोबत सिलेंडरच्याही किंमती वाढल्या का?

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या मनात एलपीजी सिलेंडरचे दर वाढणार का? अशा शंका येत आहेत. तर त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. आज घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

२३ मे २०२६ रोजी मुंबईमध्ये LPG सिलेंडरचा दर हा ९१२.५० रुपयांवर पोहोचला. तर दिल्लीमध्ये हा दर ९१३ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या आकड्यात काहीही बदल झालेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : तिशीतच केस पांढरे होत आहेत, काळेभोर केस या करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा

Maharashtra News Live Update: बीड पोलिसांना 112 वर खोटा फोन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

मसाला डोसा खाऊन कंटाळा आलाय? नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत 'शेवग्याच्या शेंगाचा डोसा'

Kobi Matar Bhaji Recipe : कोबीच्या भाजीला द्या मसालेदार ट्विस्ट, बनवा ढाबा स्टाइल कोबी मटर मसाला

Mumbai : मुंबईतील रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची जोरदार चर्चा; भाजपला डिवचलं

SCROLL FOR NEXT