LPG Gas Cylinder saam tv
बिझनेस

LPG New Rule: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, 'ही' एक चूक केल्यास गॅस कनेक्शन होईल कट

LPG Gas Cylinder Rules: एलपीजी गॅस सिलिंडर आणि पीएनजी कनेक्शनच्या नियमामध्ये सरकारने पुन्हा मोठा बदल केला आहे. एक घर, एक कनेक्शन हा नियम सरकारने आणला आहे. यानुसार तुम्हाला एकच कनेक्शन दिले जाईल.

Priya More

Summary -

  • एलपीजी सिलिंडरच्या नियमात सरकारने पुन्हा मोठा बदल केला

  • ‘एक घर, एक कनेक्शन’ नियमाची कठोर अंमलबजावणी

  • LPG आणि PNG दोन्ही कनेक्शन ठेवणाऱ्यांवर होणार कारवाई

  • नियम मोडल्यास गॅस कनेक्शन बंद होणार

एलपीजी सिलिंडरच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. जर तुमच्या घरामध्ये एलपीजी आणि पीएनजी दोन्ही वापरले जात असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. केंद्र सरकार 'एक घर, एक कनेक्शन' या नियमाची कठोरपणे अंमलबजावणी करत आहे. नवीन नियमांनुसार, एका कुटुंबासाठी एकाच वेळी अनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडर आणि पीएनजी कनेक्शन घेणे आता पूर्णपणे बेकायदेशीर असणार आहे.

'एक घर, एक कनेक्शन' या नियमानुसार आता तुम्हाला फक्त एलपीजी गॅस सिलिंडर मिळेल किंवा पीएनजीचे कनेक्शनच मिळेल. दोन्ही एकत्र मिळणार नाही. मध्य पूर्वेतील देशांमध्ये वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे एलपीजीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. जर तुमच्याकडे एलपीजी सिलिंडर आणि पीएनजी दोन्ही असेल तर तुमचे गॅस कनेक्शन कट केले जाईल.

अनुदानित एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि ज्या गरजू कुटुंबांपर्यंत पीएनजी पाईपलाईन अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्यांच्यापर्यंतच गॅस सिलिंडर पोहोचावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दिल्ली आणि देशभरातील इतर प्रमुख शहरांमधील गॅस कंपन्या आता एकाच वेळी दोन्ही कनेक्शन घेणाऱ्या घरांचा शोध घेत आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या एका नवीन आदेशानुसार, तेल कंपन्या आणि वितरकांना पीएनजी वापरणाऱ्या कुटुंबांना नवीन एलपीजी सिलिंडर देऊ नयेत किंवा त्यात रिफिल करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्यांच्या घरामध्ये एलपीजी सिलिंडर आणि पीएनजी हे दोन्ही कनेक्शन असल्यास तुम्हाला तुमचा एलपीजी सिलिंडर जमा करावा लागेल. आतापर्यंत देशभरामध्ये ४३ हजारपेक्षा अधिक ग्राहकांनी स्वेच्छेने आपली एलपीजी जोडणी परत केली. पण अद्याप अनेक ग्राहकांकडे दोन्ही कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. पीएनजी आणि एलपीजी कनेक्शनबाबातच्या नव्या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे गॅस कनेक्शन कट केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT