Government LPG Support google
बिझनेस

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

Check Domestic and Commercial Cylinder Rates : १ सप्टेंबर २०२६ पासून १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात ₹९.५० ची वाढ झाली आहे. घरगुती १४.२ किलो सिलेंडरचे दर मात्र स्थिर आहेत. मुंबई-पुण्यातील नवे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

LPG Gas Price Today: नवीन महिना सुरू होताच महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी (IOC, HPCL, BPCL) १९ किलोच्या व्यावसायिक (Commercial Gas) एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे दर १ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाले आहेत. घरगुती वापरकर्त्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती (Domestic) गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ९.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता सिलिंडरची नवी किंमत २,७४७.५० रुपये झाली आहे. गेल्या महिन्यात (१ ऑगस्ट रोजी) या सिलेंडरच्या दरात २०९ रुपयांची मोठी कपात करण्यात आली होती, मात्र या महिन्यात पुन्हा किमती वाढवण्यात आल्या आहेत. व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि मिठाईच्या दुकानांचा खर्च वाढणार असून, सणासुदीच्या काळात बाहेरचे जेवण किंवा मिठाई काही प्रमाणात महागण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी ग्राहकांना धक्का बसला आहे. आजच्या नवीन दरानुसार, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, १९-किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.

जम्मू आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ईशान्येकडील राज्यांपर्यंत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ₹९.५० ने वाढ झाली आहे. दरम्यान, ५-किलोच्या रेग्युलर एलपीजी सिलेंडरची किंमत ₹३४९.५० वर स्थिर आहे, तर एक्स्ट्रालाइट सिलेंडरची किंमत ₹३३९ आहे. मात्र ५-किलोच्या नॉन-डोमेस्टिक भरलेल्या सिलेंडरची किंमत ₹७६२ वरून ₹७६४ पर्यंत वाढली आहे.

महाराष्ट्रात एलपीजीची किंमत

इंडियन ऑइलच्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये, व्यावसायिक सिलेंडर कालच्या ₹२,९०६ च्या तुलनेत आता ₹२,९१६.५० ने महाग झाला आहे. घरगुती असो वा व्यावसायिक सर्वात स्वस्त सिलेंडर मुंबई, पुण्यात मिळतोय. महाराष्ट्रात घरगुती सिलेंडरची किंमत ₹९४१.५० आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹२,७०१ आहे. ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹२,६९१.५० होती. आज त्यात ₹९.५० ची वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

SCROLL FOR NEXT