LPG e-KYC New Rule meta ai
बिझनेस

LPG eKYC : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC केली नाही तर होणार आर्थिक नुकसान, जाणून घ्या नवा नियम

LPG Subsidy : LPG ग्राहकांसाठी नवा नियम लागू होणार आहे. १ ऑक्टोबरपासून सबसिडीसह नियमन केलेल्या दरात सिलिंंडर घेण्यासाठी ई केवायसी आणि Biometric Aadhaar Authentication आवश्यक असेल.

Sakshi Sunil Jadhav

देशभरातल्या घरगुती LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस कनेक्शनधारकांनी e-KYC प्रोसेस पूर्ण करणं महत्त्वाचं असणार आहे. e-KYC पूर्ण केली नाहीतर भविष्यात ग्राहकांना सबसिडीचा लाभ मिळणार नाही आणि बाजारभावाने LPG सिलेंडर घ्यावा लागू शकतो. त्यामळे घरगुती गॅसच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदूस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तेल कंपन्यांनी गॅस एजन्सींना यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. e-KYC पूर्ण न केलेल्या ग्राहकांसाठी ५ किलो आणि १० किलोच्या सिलेंडरचा पर्याय उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे सिलेंडर बाजारातल्या व्यावसायिक दरानुसार दिले जाऊ शकतात.

दहा वर्षांनंतर पुन्हा दोन दरांची व्यवस्था?

घरगुती LPG सिलेंडरसाठी जवळपास दहा वर्षांनंतर पुन्हा दुहेरी किंमत प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. या व्यवस्थेत e-KYC पूर्ण केलेल्या पात्र ग्राहकांना सब्सिडीचा लाभ मिळेल, तर e-KYC न केलेल्या ग्राहकांना बाजारभावाने सिलिंडर घ्यावा लागू शकतो.

LPG सिलेंडरचे दोन वेगवेगळे दर

सध्याच्या व्यवस्थेनुसार घरगुती LPG सिलेंडरची किंमत ९५२ रुपये असून, त्यामध्ये १२ रुपयांची सबसिडी समाविष्ट असल्याचं दिलेल्या माहितीत नमूद आहे. प्रस्तावित दुहेरी दर व्यवस्थेत e-KYC न केलेल्या ग्राहकांना बाजारभावाचा सिलिंडर मिळण्याची शक्यता आहे. उज्ज्वला योजनेतल्या ग्राहकांसाठीही बाजारभावाशी संबंधित नियम लागू होण्याची माहिती देण्यात आली आहे.

मात्र ही व्यवस्था नेमकी कधीपासून लागू होणार, याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी e-KYC प्रोसेस वेळेत पूर्ण करून आपल्या LPG कनेक्शनची स्थिती तपासणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT