LPG E-KYC Deadline Tomorrow saam tv
बिझनेस

झटपट पटापट! LPG e-KYC साठी उरले फक्त २ दिवस; आधार अन् मोबाईल जवळच ठेवा, अन्यथा...

LPG e-KYC Update: Indane, Bharatgas आणि HP Gas ग्राहकांसाठी LPG e-KYC ची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2026 आहे. आधार, मोबाइल आणि अधिकृत अॅपद्वारे घरबसल्या e-KYC कशी पूर्ण करायची, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

Omkar Sonawane

Indane, Bharat Gas आणि HP Gas चा वापर करणाऱ्या LPG ग्राहकांसाठी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2026 आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांचे व्हेरीफिकेशन अद्याप बाकी आहे. त्यांच्याकडे आता अवघे काही तास उरले आहे. मात्र यासाठी कुठेही रांगेत ताटकळत उभे राहण्याची किंवा LPG च्या कार्यालयात जाण्याची गरज नाहीये. स्मार्टफोन, आधार कार्डची माहिती आणि LPG कनेक्शन शी जोडलेल्या मोबाइल नंबरच्या मदतीने घरबसल्या e-KYC पूर्ण करता येते.

LPG e-KYC साठी काय आवश्यक आहे?

आधार कार्ड किंवा आधार नंबर

LPG कनेक्शनशी जोडलेला मोबाइल क्रमांक

LPG कंझ्युमर नंबर किंवा LPG ID

इंटरनेट सुविधा असलेला स्मार्टफोन

LPG प्रोव्हायडरचे अधिकृत अ‍ॅप

चेहऱ्याच्या पडताळणीसाठी Aadhaar FaceRD अ‍ॅप

Indane ग्राहक Indian Oil ONE अपच्या माध्यमातून e-KYC पूर्ण करू शकतात. यासाठी गूगल प्ले स्टोअरवरून अप डाउनलोड करा. त्यानंतर LPG अकाउंटशी जोडलेल्या मोबाइल नंबरने लॉगिन करा, मेन्यूमधील My Profile या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Re-KYC पर्याय निवडून आधार नंबर टाका. Aadhaar FaceRD अ‍ॅप द्वारे चेहऱ्याच्या पडताळणीसाठी दिलेल्या सुचनांचे पालन करा आणि सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिक्वेस्ट सबमिट करा.

Bharat Gas ग्राहकांसाठी काय प्रक्रिया आहे?

भारत गॅस ग्राहक Hello BPCL अॅपचा वापर करून e-KYC करू शकतात. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाने लॉगिन केल्यानंतर होमपेजवरील LPG सेक्शनमध्ये जाऊन LPG ID वर क्लिक करा. त्यानंतर e-KYC किंवा Aadhaar Authentication हा पर्याय निवडा. मोबाइलवर आलेला OTP टाकल्यानंतर Aadhaar FaceRDच्या मदतीने चेहऱ्याचे स्कॅनिंग करून प्रक्रिया पूर्ण करा.

HP Gas ग्राहकांनी काय करावे?

HP Gas ग्राहक HP Pay अॅपद्वारे e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. मोबाइल क्रमांकाने रजिस्टर किंवा साइन-इन केल्यानंतर मुख्य डॅशबोर्डवरील LPG/Gas Connection या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Aadhaar Authentication निवडा. आधार पडताळणीसाठी संमती द्या आणि आवश्यक फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा. शेवटी व्हेरिफिकेशन स्टेटस यशस्वीरित्या अपडेट झाले आहे की नाही, याची खात्री करा.

23 ऑगस्टपर्यंत e-KYC केले नाही तर काय होईल?

23 ऑगस्टपर्यंत e-KYC पूर्ण न केल्यास सरकारकडून बँक खात्यात येणारी LPG सब्सिडी बंद होऊ शकते. यामध्ये सामान्य LPG सब्सिडी तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 300 रुपयांच्या सब्सिडीचाही समावेश आहे. यामुळे दोन्ही सब्सिडी बंद होईल. तसेच LPG कनेक्शन ‘सस्पेंडेड’ किंवा ‘डॉर्मंट’ श्रेणीत टाकले जाऊ शकते. अशा परिस्थितीत अॅप, IVR किंवा व्हॉट्सअॅपद्वारे गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यास बुकिंग रिजेक्ट होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे LPG ग्राहकांनी वाट न पाहता 23 ऑगस्टआधी म्हणजे आजच आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे देतात फॉरेनचा फील, रिमझिम पावसात मारा फेरफटका

Sunday Horoscope : मन शांत राहील, ६ राशींच्या व्यक्तींना धनलाभ; वाचा रविवारचे राशीभविष्य

Morning Exercise: खरचं वजन कमी करायचय? मग सकाळी उठल्यावर हे ५ व्यायाम केलेचं पाहिजेत

Maharashtra News Live Update: अक्कलकुव्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलेचा मृत्यू

Rahul Gandhi Today Live: राहुल गांधी कार्यक्रमस्थळाकडे जाण्यास रवाना, थोड्याच वेळात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT