LIC Saral Pension Scheme Saam TV
बिझनेस

LIC Saral Pension Yojana: एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा; काय आहे LIC सरल पेन्शन योजना? जाणून घ्या

LIC Saral Pension Scheme Details in Marathi: प्रत्येकजण भविष्यात आर्थिक अडचण येऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच बचत करतात. सरकारी योजना, बँकेत एफडी अशा अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशीच एक योजना म्हणजे एलआयसी सरल पेन्शन योजना.

Siddhi Hande

प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. लोक अगदी शेअर बाजारापासून ते सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. परंतु शेअर मार्केटमध्ये जोखिम असते. त्यामुळेच अनेकजण पोस्ट ऑफिस, एलआयसी आणि सरकारी योजनेत गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास परताव्याची हमी असते. तुम्हाला एका ठरावीक काळानंतर निश्चित रक्कम मिळते. अशीच एक एलआयसीची योजना आहे. एलआयसीच्या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळते.

एलआयसी सरल पेन्शन योजनेत तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आयुष्यभर पेन्शन मिळेल. या योजनेतून मिळणारी रक्कम तुम्ही खर्चासाठी वापरु शकतात.

जर एखादी व्यक्ती खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात काम करत असेल तर त्याच्या पीएफ फंडातून मिळालेली रक्कम आणि ग्रॅच्युइचटीची रक्कम जर तुम्ही या योजने गुंतवली तर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळेल. ही रक्कम तुम्हाला सेवानिवृत्तीच्या आधी गुंतवावी लागेल.

एलआयसी सरल पेन्शन योजनेत ४० वर्षांवरील व्यक्ती गुंतवणूक करु शकते. या योजनेत तुम्ही ४० ते ८० वर्षांपर्यंत कधीही गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला किमान १००० रुपये दर महिन्याला गुंतवावे लागेल. म्हणजे तीन महिन्यासाठी ३ हजार तर ६ महिन्यांसाठी ६ हजार रुपये गुंतवावे लागतील.

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत तुम्ही वार्षिक १२ हजार रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जास्तीत जास्त रक्कम गुंतवणूकीला मर्यादा निश्चित केलेली नाही. तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवणूक करणार तितकी जास्त पेन्शन तुम्हाला मिळेल. या गुंतवणूकीवर तुम्हाला वार्षिक, सहामाही आधारावर पेन्शन मिळते.

एलआयसीच्या योजनेत जर ४२ वर्षीय व्यक्तीने ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला दर महिन्याला १२,३८८ रुपयांची पेन्शन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT