LIC Saral Pension Plan Saam Tv
बिझनेस

LIC Pension Scheme: एलआयसीची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा, दरमहा मिळेल पेन्शन

LIC Saral Pension Plan: एलआयसीची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा, दरमहा मिळेल पेन्शन

Satish Kengar

LIC Pension Scheme: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे (LIC) प्रत्येक वयोगटासाठी पॉलिसी आहेत. यापैकी अनेक योजना अतिशय लोकप्रिय आहेत आणि सुरक्षित गुंतवणूक, तसेच गुंतवणुकीच्या रकमेवर जबरदस्त परतावा देतात.

यातच आपण एलआयसीच्या अशा पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला दरमहा पेन्शनची हमी देते. विशेष म्हणजे यात तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि यानंतर तुम्हाला पेन्शन मिळू लागेल. या पॉलिसीचे नाव LIC Saral Pension Plan.

योजनेसाठी वयोमर्यादा आहे 40-80 वर्षे

एलआयसी सरल पेन्शन योजना ही 40 ते 80 वर्षे वयाची व्यक्ती खरेदी करू शकते. जी आयुष्यभर पेन्शनची हमी देते. ही योजना तुम्ही एकट्याने किंवा पती-पत्नीसोबत घेऊ शकता. यामध्ये पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर केव्हाही सरेंडर करण्याची सुविधा दिली जाते. तसेच यामध्ये Death Benefits ही आहेत. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, गुंतवणुकीची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते.  (Latest Marathi News)

निवृत्ती योजना म्हणून लोकप्रिय

दरमहा निश्चित पेन्शन देणारी एलआयसी सरल पेन्शन ही एक प्रकारे निवृत्ती योजना म्हणूनही पाहिली जाते. ही योजना निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीच्या नियोजनात उत्तम प्रकारे बसते. समजा कोणतीही व्यक्ती नुकतीच निवृत्त झाली आहे. तर तो पीएफ फंडातून मिळालेले पैसे आणि निवृत्तीदरम्यान मिळालेली ग्रॅच्युइटी त्यात गुंतवू शकतो. त्यानंतर त्याला आयुष्यभर दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळत राहील.

गुंतवणुकीत कोणतीही मर्यादा नाही

एलआयसी सरल पेन्शन प्लॅनमध्ये तुम्ही वार्षिक किमान 12,000 रुपयांची Annuity खरेदी करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही, तुमच्या गुंतवणुकीनुसार तुम्हाला पेन्शन मिळू शकते. या योजनेत कोणत्याही व्यक्तीला या योजनेअंतर्गत एकदा प्रीमियम भरल्यानंतर वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर पेन्शन मिळू शकते. एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, जर 42 वर्षीय व्यक्तीने 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला दरमहा 12,388 रुपये पेन्शन म्हणून मिळणार.

टीप : कोणतीही योजना घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि योजनेबद्दल संपूर्ण माहिती घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT