LIC Jeevan Shanti Scheme Saam Tv
बिझनेस

LIC Jeevan Shanti Scheme: मस्तच! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा; LIC जीवन शांती पॉलिसी आहे तरी काय?

LIC Jeevan Shanti Scheme: एलआयसीच्या जीवन शांती पॉलिसीत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला एकदा गुंतवणूक करायची आहे अन् आयुष्यभर पेन्शन मिळवायची आहे.

Siddhi Hande

भविष्यात कधीही पैशांची अडचण भासू नये, यासाठी फार आधीपासूनच काळजी घ्यायची असते. वेगवेगळ्या ठिकाणी पैशांची बचत करुन गुंतवणूक करायची असते. यासाठी काही सरकारी योजना आहे. सरकारी योजनांमध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. तसेच सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला किंवा एकरकमी पेन्शन मिळते. अशीच एक योजना म्हणजे एलआयसी जीवन शांती पॉलिसी. या योजनेत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. तुम्हाला आयुष्यभर १ लाख रुपयांची पेन्शन मिळू शकते. (LIC Jeevan Shanti Scheme)

एलआयसी जीवन शांती ही योजना एक रिटायरमेंट प्लान आहे. यामध्ये तुम्हाला आर्थिक सुरक्षितता मिळते. एलआयसी जीवन शांती पॉलिसी हा एक सिंगल प्रिमियम प्लान आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरवर्षी १ लाख रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

फक्त एकदा गुंतवणूक करा, आयुष्यभर मिळेल पेन्शन (One Time Investment Give Lifetime Pension)

अनेकदा आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो. यामुळे तुम्हाला रिटायरमेंटनंर दर महिन्याला पेन्शन मिळते. एलआयसी जीवन शांती पॉलिसीत एक गुंतवणूक आयुष्यभरासाठी पेन्शन मिळवून देईल.

पात्रता

एलआयसी जीवन शांती (LIC Jeevan Shanti) पॉलिसीत ३० ते ७९ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत कोणत्याही प्रकारची रिस्क नसते. या योजनेत तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातात. एक म्हणजे डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि दुसरा म्हणजे डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ. म्हणजे तुम्ही एकासाठी आणि दोघांसाठी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकतात.

आयुष्यभरासाठी १ लाख रुपयांची पेन्शन

एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसी हा अॅन्युटी प्लान आहे. या योजनेत तुम्हाला पेन्शन लिमिट फिक्स्ड करायची असते. या योजनेत जर ५५ वर्षीय व्यक्तीने ११ लाख रुपये गुंतवले आणि ५ वर्षांसाठी हे पैसे होल्ड केले तर तुम्हाला वर्षाला १,०१,८८० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते. म्हणजेच महिन्याला ८,१४९ रुपयांची पेन्शन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT