LIC Policy Yandex
बिझनेस

Investment Scheme: रोज 252 रुपये वाचवा, मॅच्युरिटीवर मिळतील 54 लाख रुपये; LIC ची जबरदस्त योजना

LIC Policy: LIC ची जीवन लाभ पॉलिसी खातेदाराला भरपूर गुंतवणूक केल्यानंतर मॅच्युरिटीवर मोठा परतावा देते. एलआयसीने नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ही योजना सुरू केली आहे.

Rohini Gudaghe

LIC Jeevan Labh Policy

चांगलं जीवन जगण्यासाठी सर्वांना पुरेशा पैशाची गरज पडते. त्यासाठी प्रत्येकजण पैसा कमवतो. तो पैसा योग्य योजनेत आपण गुंतवतो. निवृत्तीनंतर चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा असणं गरजेचं (LIC Policy) आहे. एलआयसीने नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अशीच एक योजना सुरू केली आहे. एलआयसीची जीवन लाभ पॉलिसी असं या योजनेचं नाव आहे. (Latest News)

या योजनेमुळे मूलभूत सुविधांची चिंता करावी लागणार नाही. आपण या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. या योजनेत, खातेदाराचा मृत्यू झाल्यास, त्याला विम्याच्या रकमेच्या किमान 105 टक्के अधिक रक्कम (LIC Jeevan Labh Policy) मिळते. कालावधीनुसार विम्याची रक्कम बदलू शकते. याशिवाय मृत्यू न झाल्यास खातेधारकाला मॅच्युरिटीवर 54 लाख रुपये मिळतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जीवन लाभ पॉलिसी

या योजनेमध्ये एका महिन्यात 7 हजार 572 रुपये, म्हणजेच दररोज 252 रुपये गुंतवावे लागतात. यानंतरच मॅच्युरिटीवर 54 लाख रुपये मिळतात. ही मर्यादित प्रीमियम भरणारी आणि नॉन-लिंक केलेली एक योजना (Investment Scheme) आहे. ही योजना पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. यासोबतच पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिल्यास त्याला मोठी रक्कम मिळते. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना त्यांच्या इच्छेनुसार प्रीमियमची रक्कम आणि कालावधी निवडण्याचा अधिकार आहे.

पॉलिसी कोण घेऊ शकते?

ही पॉलिसी घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल 59 वर्षे आहे. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी घेतली, तर त्याला दर महिन्याला 7 हजार 572 रुपये किंवा दररोज 252 रुपये गुंतवावे (Latest Investment Scheme) लागतील. या अर्थाने, त्याला एका वर्षात 90 हजार 867 रुपये जमा करावे लागतील. मॅच्युरिटीनंतर, पॉलिसीधारकाला 54 लाख रुपये मिळतात. यामध्ये पॉलिसीधारकाला बोनस देखील मिळतो. तो सतत बदलत राहतो.

या योजनेत 8 ते 59 वर्षे वयोगटातील कोणताही नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या पॉलिसी अंतर्गत, विमाधारक 10, 13 आणि 16 वर्षांसाठी पैसे गुंतवु शकतात. त्यांना 16 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटीवर पैसे दिले (Jeevan Labh Policy) जातील. 59 वर्षांची व्यक्ती 16 वर्षांसाठी विमा पॉलिसी निवडू शकते. याशिवाय पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला लाभ मिळतो. बोनससोबत विमा कंपनी नॉमिनीला विम्याच्या रकमेचा लाभ देखील देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT