LIC Policy Saam Tv
बिझनेस

LIC Policy: दररोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख मिळवा; LIC ची जीवन आनंद पॉलिसी नेमकी आहे तरी काय?

LIC Jeevan Anand Policy: एलआयसीची नागरिकांसाठी एक खास योजना आहे. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत गुंतवणूक केल्याने तुम्हाला भविष्यात कधीच पैशाची गरज भासणार नाही.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळतो. त्याचसोबत आपले पैसे सुरक्षित असल्याचे आपल्याला माहित असते. सरकारने गुंतवणूकीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचसोबत पोस्ट ऑफिस, एलआयसीच्या अनेक योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करु शकतात. एलआयसीची अशीच एक योजना म्हणजे एलआयसी जीवन आनंद पॉलिसी.

एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला भविष्यात कधीही पैशांची अडचण येणार नाही. या पॉलिसीत गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला रोज ४५ रुपये गुंतवून मॅच्युरिटीनंतर २५ लाख रुपये जमा करु शकतात. (LIC Jeevan Anand Policy)

एलआयसी जीवन आनंद पॉलिसी हा एक टर्म प्लान आहे.ज्यात तुम्ही जेवढ्या काळासाठी गुंतवणूक कराल तेवढ्या काळासाठी तुम्हाला प्रिमियम द्यावा लागेल. या योजनेत जर तुम्ही महिन्याला ४५ रुपये गुंतवतात. तर तुम्ही १३५९ रुपये जमा करतात.

या योजनेत जर तुम्ही महिन्याला १३५९ रुपये गुंतवले तर वर्षाला १६,३९९ रुपयांची गुंतवणूक कराल. त्यामुळे ३५ वर्षानंतर तुम्ही ५,७०,५००० रुपयांची गुंतवणूक कराल. या योजनेत बेसिक सम एश्योर्ड ५ लाख रुपये आहे. मॅच्युरिटी पीरियडनंतर तुम्हाला रिविजनरी बोनस ८.५ लाख रुपये आणि फायनल बोनस ११.१५० लाख रुपये मिळेल. यामुळे तुम्हाला ३५ वर्षानंतर २५ लाख रुपये मिळणार आहे.

या योजनेत कमीत कमी १५ वर्ष गुंतवणूक करायची आहे. जास्तीत जास्त ३५ वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुमची ६.२५ लाखांची कमीत कमी रिस्क कव्हर होते. (LIC Policy)

या पॉलिसीत चार प्रकारचे रायडर्स मिळतात. ज्यात अपघाती मृत्यू, डिसॅबिलिटी रायडर, अपघात बेनिफिट रायडर, न्यू टर्म इन्शुरन्स रायडर आणि न्यू क्रिटिकल बेनिफिट रायडरचा समावेश आहे. या योजनेत पॉलिसीधारकांचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला १२५ टक्के बेनिफिट मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

SCROLL FOR NEXT