LIC Scheme Saam tv
बिझनेस

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Insurance : एलआयसीने बंद पडलेल्या पॉलिसीधारकांसाठी विशेष मोहीम जाहीर केली आहे. १८ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२५ दरम्यान ग्राहकांना प्रीमियम शुल्क सवलतीसह पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी.

Sakshi Sunil Jadhav

भारतीय जीवन विमा महामंडळाने म्हणजेच LICने आपल्या पॉलिसीधारकांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. अनेकदा काही कारणास्तव पॉलिसीधारकांना वेळेवर प्रीमियम भरता येत नाही. त्यामुळे त्यांची विमा पॉलिसी बंद होत असते. यामुळे पॉलिसीधारकांच्या मनात पैसे वाया जातील अशी भीती निर्माण होते. मात्र आता ग्राहकांना याबाबत काळजी करण्याची गरज नाही. कारण, एलआयसीने बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे.

ही मोहीम सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सुरू झाली असून ती १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. एका महिन्याच्या या कालावधीत ग्राहकांना त्यांची बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान विलंब शुल्कावर आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत.

नॉन-लिंक्ड टर्म इन्शुरन्स पॉलिसी पुन्हा सुरू करताना विलंब शुल्कावर ३० टक्के सूट दिली जाणार असून त्याची मर्यादा ५,००० रुपयांपर्यंत असेल. तर सूक्ष्म विमा पॉलिसींमध्ये कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी संपूर्ण १०० टक्के विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत, ज्या पॉलिसींची प्रीमियम भरण्याची अंतिम तारीख संपली आहे, पण मुदत पूर्ण झालेली नाही, त्या पॉलिसीधारकांना पुन्हा त्यांचे संरक्षण सुरू करता येईल. पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून ५ वर्षांच्या आतच पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी मिळणार आहे. पॉलिसी पुन्हा सुरू करताना लागणाऱ्या वैद्यकीय तपासण्या आणि आरोग्याशी संबंधित अटी मात्र पूर्ववत राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : कोरडवाहू शेतकर्‍याचा मुलगा झाला अधिकारी! MPSC मध्ये महाराष्ट्रात टॉप १० मध्ये, अख्खा गावात जल्लोष

CM Devendra Fadnavis: रखडलेल्या प्रकल्पांवरुन मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर संताप; शांत, संयमी फडणवीसांचा रुद्रावतार

Bhagavad Gita: तुम्हाला क्रोध येण्याचं खरं कारण माहितीये का? श्रीकृष्णांचं भगवद्‌गीतेतील गूढ उत्तर जाणून घ्या

Maharashtra Live News Update: निलेश घायवळवर आणखी एक मोक्का, तरुणावर केला होता कोयत्याने हल्ला

Amitabh Bachchan : पैसाच पैसा! बिग बींनी मुंबईतील 2 लग्जरी फ्लॅट्स विकले, नफा वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT