Lek Ladki Yojana Saam Tv
बिझनेस

Lek Ladki Yojana: महाराष्ट्रातील मुलींसाठी खास योजना! जन्मानंतर मिळणार १ लाख रुपये; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या...

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी, मुलींसाठी आहेत. महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षांच्या होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

मुलींच्या जन्माचे दर वाढावे, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मासाठी, शिक्षणासाठीआर्थिक मदत केली जाते. लेक लाडकी योजनेअंतर्गत मुली १८ वर्षांच्या होईपर्यंत १ लाख रुपयांची मदत केली जाते.

लेक लाडकी योजना नक्की आहे तरी काय? (What Is Lek Ladki Yojana)

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मावेळी ५,००० रुपयांची मदत केली जाते. जेव्हा मुलगी पहिलीत जाईल त्यावेळी ६००० रुपये दिले जातात. त्यानंतर जेव्हा मुलगी सहावीत जाईल तेव्हा ७००० रुपये दिले जातात. यानंतर तुमची मुलगी कॉलेज म्हणजेच ११ वीत जाईल तेव्हा ८००० रुपये दिले जातील.

मुलगी जेव्हा १८ वर्षांची होईल तेव्हा या योजनेअंतर्गत ७५००० रुपये दिले जातात. म्हणजेच मुलींच्या जन्मापासून ते अगदी १८ वर्षांची होईपर्यंत १,०१,००० रुपये दिले जातात.

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

लेक लाडकी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील रहिवासी मुलींना मिळणार आहे. ज्या मुलींकडे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांचे वार्षिक उत्पन्न १०००० रुपयांपेक्षा जास्त नाही. त्यांनाच या योजनेचा लाभ घेणार आहे.या योजनेचा लाभ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kheer Recipe : देवीसाठी नैवेद्यात बनवा ओल्या नारळाची खिर; चव चाखताच संपूर्ण टोप फस्त कराल

SA vs IRE: अफगाणिस्ताननंतर दक्षिण आफ्रिकेला आयर्लंडचा दणका! मिळवला ऐतिहासिक विजय

Job At Google: गूगलमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी; मिळणार लाखोंचे वेतन; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : बेशिस्त पुणेकरांवर महापालिकेची कारवाई, ३ कोटींचा दंड केला वसूल

Accident News : घर सोडून काही अंतरावर जाताच काळाचा घाला; बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT