तुमच्या घरात लेक जन्माला आली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून लेक लाडकी योजना राबवली जाते. या योजनेमध्ये पात्र असलेल्या मुलींना विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे, पात्रता पूर्ण करणाऱ्या मुलीला एकूण १ लाख १ हजार इतकी आर्थिक मदत मिळू शकते. मुंबईत या योजनेअंतर्गत एकूण ३,५६३ लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबई शहरातील ६७१ आणि मुंबई उपनगरातील २,८९२ लाभार्थींचा समावेश आहे.
लेक लाडकी योजनेत मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण आणि वयाच्या १८ वर्षांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थित मदत दिली जाते.
मुलीच्या जन्मावेळी - ५००० रुपये
इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेताना - ६००० रुपये
इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेताना - ७००० रुपये
इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेताना - ८००० रुपये
१८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५,०००
अशा प्रकारे एकूण १,०१,००० आर्थिक मदत मिळते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचं आहे. तसेच कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा जास्त नसावे. योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या जास्तीत जास्त दोन मुलींना मिळू शकतो. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास, इतर पात्रता पूर्ण केल्यावर मुलीलाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
अंतिम ₹75,000 मिळवण्यासाठी मुलीचं वय १८ वर्षे पूर्ण झालेलं असावं आणि ती अविवाहित असावी. काही प्रकरणांमध्ये लाभ घेताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणंही आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.