Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

Ladki Bahin Yojana 1500 Installment : लाडकी बहीण योजनेच्या ₹१,५०० हप्त्यावर गंभीर आरोप झाले आहेत. पुरुष आणि अपात्र लाभार्थ्यांना पैसे मिळाल्याचा दावा असू, एससी - एसटी निधी वळवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanameta ai
Published On

नुकताच लाडकी बहिण योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेत पुरुष, अपात्र महिला तसेच एकाच कुटुंबातल्या अनेक सदस्यांना लाभ मिळाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. यासोबतच अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी राखीव असलेला निधी योजनेसाठी वळवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

पातोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत एससी आणि एसटी प्रवर्गाच्या विकासासाठी राखीव असलेला ४,६०१.१३ कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला, असा त्यांचा आरोप आहे. हा निधी तातडीने संबंधित विभागाकडे परत करण्याची मागणी त्यांनी केली.

Ladki Bahin Yojana
अर्धा लिंबू उरलाय? फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी 'ही' सोपी ट्रिक करा, अनेक दिवस राहील ताजा, रसही आटणार नाही

कॅगच्या निरीक्षणांचा दाखला

लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक व्यवस्थापन आणि अंमलबजावणीवर कॅगने गंभीर निरीक्षणे नोंदवल्याचा दावा पातोडे यांनी केला. त्यांच्या म्हणण्यांनुसार, योजनेसाठी ठरवलेल्या तरतुदीपेक्षा ३,५४१.१६ कोटी रुपये जास्त खर्च करण्यात आले. जास्तीच्या खर्चाचे ठोस कारण महिला व बाल विका, विभागाला देता आले नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Ladki Bahin Yojana
LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत १५,५८६ कोटी रुपये थेट लाभार्थ्यांना वितरित न करता ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट्स’मध्ये ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. कॅगे याकडे आर्थिक शिस्तीचा अभाव आणि अनियमितता म्हणून पाहिल्याचं पातोडे यांनी सांगितलं.

१४ हजार २९८ पुरुषांना लाभ?

लाडकी बहीण योजना महिलांसाठी असताना १४,२९८ पुरुषांना दरमहा १,५०० रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे सुमारे २१.४४ कोटी रुपयांचे चुकीचे वाटप झाल्याचे पातोडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com