Gold Price Drop Today saam tv
बिझनेस

Gold Price Drop Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात २,८०० रुपयांनी घसरण, मुंबईतील आजचा दर किती?

Today's Gold Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरल्या. नवीन दर, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे तसेच चांदीचे दर जाणून घ्या एका क्लिकवर.

Sakshi Sunil Jadhav

Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. मध्यंतरी सोने-चांदीच्या किंमतीनी लाखांचा आकडा पार केला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक खूश नसल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. मात्र आता सर्वसामान्यांना पुन्हा कमी दरात सोने-चांदी करता येणार असा अंदाज आहे. पुढे goodreturns या अधिकृत वेबसाईटवरील सोने-चांदीच्या किमती जाणून घेऊयात.

आजचे सोन्याचे दर

आज १ तोळा सोन्याचा दर हा ९,७६,९०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७८,१५२ रुपये आहे. तर १०० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत २,८०० रुपयांनी घट झाली आहे. हे दर ९,७६,९०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोने

२२ कॅरेट सोन्याचे दर सुद्धा कमी झाले आहेत. १ तोळा सोन्याचे दर २,५०० रुपयांनी कमी झालेत. हा दर ८,९५,५०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७१,६४० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ८९,५५० रुपये आहे. तसेच १०० ग्रॅम सोने ८,९५,५०० रुपये आहे.

१८ कॅरेट सोने

१८ कॅरेट सोन्याचे दर सुद्धा कमी झाले आहेत. १ तोळा सोन्याचे दर २,१०० रुपयांनी कमी झालेत. हा दर ७,३२,७०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,६१६ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,२७० रुपये आहे. तसेच १०० ग्रॅम सोने ७,३२,७०० रुपये आहे.

चांदीचा आजचा भाव

चांदीचे दर गेल्या काही दिवसात स्थिर आहेत. १० ग्रॅम चांदी १,०८० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीच्या दरात १,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर १,०८,००० रुपये झाले आहेत.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT