Gold Silver Price Down Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (17th August): गुड न्यूज ! सोन्याचा भाव आपटला, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचा भाव

Today's 17th August Gold Silver Rate In Maharashtra : मागच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (17th August):

आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांना सध्या तडजोड करावी लागत आहे. अमेरिकेत वाढलेल्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावावर लगाम लावण्यात आला आहे. जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या भावात पडझड सुरु आहे.

ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मागील महिन्यात सोन्या-चांदीच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. मागच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती. येत्या आठवड्यात सोन्या-चांदीचा भाव किती असेल हे जाणून घेऊया.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार 16 ऑगस्टला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,600 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,550 रुपये मोजावे लागले होते. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,200 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,170 रुपये मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या भावात 380 रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७३,००० रुपये प्रति किलोने विकली गेली तर आज चांदीसाठी ७२५०० रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी आज पाहायला मिळेल.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याची (Gold) किंमत 59,020 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर 59,020 रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,020 रुपये इतका असेल.

4.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेची मुंबईत रेकी

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये किळसवाणा प्रकार, मॉलमध्ये उंदीर खातायेत आईस्क्रीम; Video Viral

Maharashtra Politics: रायगडमध्ये शीतयुद्धाचा नवा अध्याय, गोगावलेंचा इशारा, अजित पवारांचा पलटवार

SCROLL FOR NEXT