Gold Silver Price Down Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (10th August): खरेदीला लागा! सोन्याचा भाव गडगडला, चांदीही नरमली; जाणून घ्या आजचे दर

Today's 10th August Gold Silver Rate In Maharashtra : अमेरिकन केंद्रिय बँकेतही रेपो रेट घसरल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात झालेले बदल पाहायला मिळाले

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (10th August):

रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाच्या पतधोरणाच्या निर्णयानंतर बाजारात सेन्सेक्सचा भाव घसरला त्यामुळे गुंतवणूकीदारांना मोठा फटका बसला आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावातही घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

अमेरिकन केंद्रिय बँकेतही रेपो रेट घसरल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात झालेले बदल पाहायला मिळाले. डॉलर मजबूत झाला असून गुंतवणूकीदारांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरणीचे सत्र सुरु आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली होती. तर या आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोने-चांदीत पडझड सुरुच आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव

1. आजचा सोन्याचा भाव

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आज १० ऑगस्टला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,९४० आहे तर काल याची किंमत ५९,२१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. त्यामुळे सोन्याच्या भावात २७० रुपयात घसरण झाली आहे.

2. चांदीचा भाव

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७०,०६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,३२० रुपये प्रतिकिलो होती. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी आज पाहायला मिळेल.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,९४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold)  दर ५८,९४० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,९४० रुपये इतका असेल.

4.  हॉलमार्कचे (Hallmark)  सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT