मुलींसाठी लखपती बिटिया योजना
मुलींना मिळणार १ लाख रुपये
जन्मापासून ग्रॅज्युएशनपर्यंत मिळणार आर्थिक मदत
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारनंतर आता विविध राज्य सरकारनेही महिलांसाठी आणि मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. नुकतीच दिल्ली सरकारने एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. मुलींसाठी लखपती बिटिया योजना राबवण्यात आली आहे.
मुलींसाठी लखपती बिटिया योजना (Lakhpati Bitiya Yojana)
दिल्ली सरकारने मंगळवारी लखपती बिटिया योजनेची घोषणी केली. ही योजना २००८ मध्ये सुरु केलेल्या दिल्ली लाडली योजनेचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या योजनेत मुलींच्या जन्मापासून मदत केली जाते. मुलींच्या शिक्षणासाठी लाखो रुपये दिले जातात.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून ही अपग्रेडेड योजना सुरु करणार आहे. जुनी लाडली योजना बंद करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नवीन योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना ५६००० रुपये दिले जाणार आहेत. वेगवेगळ्या वयोगटात आणि शिक्षणानुसार पैसे दिले जाणार आहे. हे पैसे मुलींच्या जन्मापासून ते ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमापर्यंत दिले जातील.
याबाबत माहिती देताना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, एक स्टॅक्चर्ड फायनान्शियर इस्ट्रुमेंटअंतर्गत ही रक्कम वाढवण्यात येईल, यासाठी सरकार लवकरच नवीन पोर्टलवर सुरु करणार आहे. ज्या मुली दिल्लीच्या रहिवासी आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. घरातील २ मुलींना योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलींना जन्मापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत १ लाख रुपये दिले जाणार आहेत.
कोणाला मिळणार लाभ?
लखपती बिटिया योजनेचा लाभ दिल्लीत जन्मलेल्या मिळणार आहे. या मुली कमीत कमी ३ वर्ष शहरात राहिलेल्या असाव्यात. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १.२० लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.