Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० नाही तर ३००० रुपये मिळणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारने केलं होतं. मात्र, अद्याप याबाबत घोषणा झालेली नाही. दरम्यान, आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर ३००० देखील देऊ, असं वक्तव्य भाजपच्या एका नेत्याने केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin yojana) मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर हे पैसे देऊ, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता भाजपच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. आर्थिक परिस्थिती आणखी सुधारली की ३००० रुपयेदेखील देऊ, असं ते म्हणाले आहेत.

भाजप नेते परिणय फुके यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु राहणार आहे. या योजनेसाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. २१०० रुपये काय ३००० रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावे लागेल. आमच्या लाडक्या बहि‍णींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलं आहे. आम्ही त्याची परतफेड करणार आहोत. १५०० रुपये सुरु ठेवणार आहोत. राज्याची परिस्थिती जशी सुधारेल तसे २१०० देऊ आणि आणखी सुधारली तर ३००० रुपये देऊ, असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. दरम्यान, २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. मात्र, अर्थसंकल्पात २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी तयार झाली आहे . याचसोबत विरोधकांनीही सत्ताधारी पक्षांना चांगलंच सुनावलं आहे.

आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर २१०० देऊ, अजित पवार

अजित पवारांनी २१०० रुपये कधी देणार याबाबत माहिती दिली आहे. सर्व सोंग करता येतात, मात्र, पैशांचं सोंग करता येत नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर लाडक्या बहि‍णींना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना २१०० कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT