Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: e-KYC मध्ये चूक! लाडकीची यादी अंगणवाडी सेविकांकडे पोहचली, आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी

Ladki Bahin Yojana Women Benefit Stopped After eKYC: लाडकी बहीण योजनेत केवायसीतील चुकांमुळे तब्बल २६ लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेतील २६ लाख महिलांची पडताळणी होणार

अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार व्हेरिफिकेशन

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. अनेक महिलांनी केवायसी केलेले नाही.दरम्यान, केवायसी करुनदेखील अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २६ लाख महिलांना केवायसीनंतरही योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केवायसी करुनही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

अंगणवाडी सेविकांकडे महिलांची यादी

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचा ईकेवायसीमुळे लाभ बंद झाला आहे. त्यांची यादी आता अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. आता यासाठी अंगणवाडी सेविकांचे काम सुरु झाले आहे. अंगणवाडी सेविका महिलांची घरोघरी जाऊन पडताळणीदेखील करत आहेत.

लाडकी बहीण योजनेत केवायसीमुळे ज्या महिलांचे लाभ बंद झाले आहेत. त्यांची यादी अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झाली आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका या महिलांच्या पत्त्यावर जाऊन त्यांची पडताळणी करणार आहेत. त्या खरंच पात्र आहेत का हे चेक करणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांकडे वंचित लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. या यादीनुसार महिलांची पडताळणी करणार आहे. त्या त्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे ही यादी सोपवण्यात येणार आहे.त्यानंतर व्हेरिफिकेशन होणार आहे. दरम्यान, जर काही अडचण आली तर घाबरुन न जाता महिलांनी अंगणवाडी केंद्रात भेट द्यायची आहे, असं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT