Mukhyamantri Annapurna Yojana Saam Tv
बिझनेस

Annapurna Yojana: लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार मोफत गॅस सिलिंडर; जाणून घ्या सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनी लवकरच मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देणार आहेत. त्यात आता लवकरच एक मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये मिळतात. याचसोबत या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहे. अन्नपूर्णा योजनेत महिलांना लवकरच गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे.

सरकारने तीन गॅस सिलिंडरपैकी एका सिलिंडरचे वितरण करण्याच आले आहे.आता लवकरच मोफत सिलिंडर देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात यापैकी एक सिलिंडर देण्यात आला होता.

अन्नपूर्णा योजनेत लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला ही प्रधानमंत्री उज्वला योजनेची लाभार्थी असावी. या योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीदेखील लाभ घेऊ शकतात.

गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावे. महिलांना लवकरच या योजनेत दुसऱ्यांदा मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. २१०० रुपये मिळणार की नाही आणि कधी मिळणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पैसे मिळतील, असं सांगण्यात येत होतं. मात्र, याबाबत अजूनही महिला व बालविकास विभागाने कोणतीही शिफारस अर्थ खात्याकडे केलेली नाही, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यानंतर आता महिलांना २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT