Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ६५ वर्षांवरील अन् २१ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; या जिल्ह्यातील ९८ हजार महिलांची पडताळणी होणार

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांनी केवायसी करुनही त्यांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान, आता ज्या महिलांचा केवायसी करुन लाभ बंद झाला आहे त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत महिलांची तपासणी होणार

अपात्र महिलांना योजनेतून वगळले जाणार

केवायसी करुनही निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य केले होते. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होतील. दरम्यान, अनेकांनी चुकीची माहिती दिल्याने केवायसीमध्ये अडचणी येत आहे. दरम्यान, आता याचसोबत अनेक लाभार्थी निकषात न बसल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेत सोलापूरातील ९८ हजार महिलांची केवायसीमध्ये माहिती चुकल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा लाभ बंद झाला आहे. परंतु या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. याचसोबत दुसरीकडे १९ हजार महिला निकषात न बसल्याची शासन यादी प्राप्त झाली आहे. शासन यादीतील सर्व महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांची केवायसी करताना चुकीची माहिती दिली आहे. यानंतर अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करणार आहे. यासाठी जिल्हास्तरावरुन गावागावात अंगणवाडी सेविकांसाठी महिलांची यादी पाठवण्यात आली आहे. या महिलांच्या घरोघरी जाऊन आता पडताळणी करणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील १५ हजार ५३० लाडक्या बहि‍णींचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. २१ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील २८२ मुलींनी योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, या महिलांची तपासणी केली जाणार असून अपात्र महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

Ajit Pawar Plane Crash: दृश्यमानता ३ किमीपर्यंतची तरीही पायलटला रनवे दिसला नाही? विमान अपघाताबाबत मोठा खुलासा

Myra Vaikul: लहान वयात ट्रोलिंग नको! मायरा वायकुळच्या पालकांचा धाडसी निर्णय

Thursday Horoscope: अहंकारामुळे वाद होण्याची शक्यता, ४ राशींनी टाळा प्रवास; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT