Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० मिळणार की नाही? आदिती तटकरे म्हणाल्या, आम्ही...

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत आदिती तटकरेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्यवेळी घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांवरुन सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहे. अर्थसंकल्पात २१०० रुपयांची घोषणा न केल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.याचसोबत विरोधकांनीही सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. मात्र, आता लाडकी बहीण योजनेत लवकरच २१०० रुपये देऊ, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलंय आम्ही त्यापासून मागे हटणार नाही, असं आदिती तटकरेंनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत. महिलांमध्ये साक्षरता निर्माण करणार आहे. २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल. आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

लाडकी बहीण योजनेवर विरोधकांची टीका

लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा अद्याप केलेली नाही, त्यामुळे विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. विधानसभा निवडणुका होऊन बरेच दिवस झाले तरीही २१०० रुपयांबाबत काहीही अपडेट आलेली नाही.

एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? (When Will April Month Installment Deposited)

मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे महिलांचे लक्ष एप्रिलच्या हप्त्याकडे लागले आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी देणार असा प्रश्न आता महिला विचारत आहेत. मागच्या महिन्यात महिला दिनाचा मूहूर्त साधत महिलांना पैसे देण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यातदेखील असाच काहीतरी मूहूर्त काढून महिलांना पैसे देण्यात येतील, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का? रूपाली चाकणकर यांची रोहिणी खडसेंवर टीका

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT