Ladki Bahin Yojana: Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹ २१०० कधी मिळणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विचारला जात आहे. दरम्यान, आता अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवर सूचक वक्तव्य केलं आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र, लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, असं काहीही झालं नाही. त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली. मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी २१०० रुपये कधी देणार याबाबत माहिती दिली आहे.

काल उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर होते. त्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.लाडक्या बहिणीला आपण दीड हजार देतोय पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार, असं त्यांनी म्हटलं आहे. याचसोबत पीक कर्जाबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.पीक कर्ज भरा असे म्हंटल्यावर माझ्यावर काहीजाणाची टीका केली. पण याबाबत मी जाहीरनाम्यात बोललो होतो पण भाषणात कुठेही बोललो नव्हतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

लाडकींना २१०० कधी?

लाडकी बहीण योजनेत(Ladki Bahin Yojana) २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो त्यामुळे महिलांना या ५ वर्षात कधीही २१०० रुपये दिले जाऊ शकतात.

या महिलांना मिळणार नाही १५०० रुपये

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना १५०० रुपये दिले जाणार नाहीत. ज्या महिला निकषात बसत नाही तरीही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज आता बाद करण्यात आले आहेत. एकूण ९ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अडीच कोटींपैकी ९ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. या महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड शहराला कारसोजेंकिक पिण्याच्या पाण्यामुळे कर्करोगाचा विळखा

...अन्यथा 5 मिनिटांत बँकेत आलो, शेतकऱ्याच्या प्रश्नावर मंत्री दादा भुसे भडकले, VIDEO

खासगी बसनं प्रवास करताय? भाड्यात तिपटीनं वाढ; ऐन दिवाळीत प्रवाशांचा दिवाळा निघणार!

Gautami Patil: हातात हिरव्या बांगड्या अन् कपाळी भंडारा, गौतमीचा अस्सल मराठमोळा थाट

Palghar : मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष, शिंदेंच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल; अटक होणार का?

SCROLL FOR NEXT