Ladki Bahin Yojana Updates Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले

Ladki Bahin Yojana Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांचा हप्ता १५०० वरुन २१०० करण्यात येणार आहे. या योजनेत वाढीव रक्कम कधी मिळणार याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.

Siddhi Hande

जुलै २०२४ मध्ये महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली होती. लाडकी बहीण योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनपर्यंत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यावर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी देण्यात येणार याबाबत महत्त्वाची समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेबाबत काल मंत्रिमंडळात काही निर्णय झाला आहेत. त्यात जानेवारीचा हप्ता देण्यासाठी निधी मंजुर केला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता हा २६ जानेवारीला देणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, यावेळी त्यांना २१०० रुपये कधी देणार असाही प्रश्न विचारण्यात आला होता. (Ladki Bahin Yojana Update)

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी वाढीव हप्त्याबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, आम्ही याबाबत अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनीही याबाबत माहिती दिली आहे. नवीन अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याबाबत सकारात्म विचार केला जाईल. तोपर्यंत महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेत जानेवारीच्या हप्त्याची महिला वाट पाहत होत्या. लाडकी बहीण योजनेत आता जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीला दिला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी ३६९० कोटी रुपयांचे वितरण करण्यास मान्यता दिली आहे. हा हप्ता लवकरच दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? या ठिकाणी धावणार नवीन बुलेट ट्रेन

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

SCROLL FOR NEXT