Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारी- मार्चचे पैसे कधी येणार? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Ladki Bahin Yojana February And March Month Installment: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत अपडेट समोर आली आहे. आदिती तटकरेंनी थेट फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याची तारीख सांगितली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता कधी देणार याबाबत मोठी घोषणा आदिती तटकरेंनी दिली आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मार्च महिन्यात दोन हप्ते महिलांना मिळणार आहेत. मार्च महिन्याचाही हप्ता लगेचच महिलांना मिळणार आहे.

फेब्रुवारीचा हप्ता ८ मार्चला दिला जाणार आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात मार्च महिन्याचा हप्ता देण्यात येईल, असं आदिती तटकरेंनी सांगितले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत आहे. त्यामुळे या काळात कधीही लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्याचे १५०० रुपये दिले जाऊ शकतात.त्यामुळे मार्च महिन्यात महिलांना ३००० रुपये मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana Update)

महिला दिनाचा मूहूर्त साधून लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकार लाडकी बहीण योजना सक्षमरित्या सुरु ठेवणार आहे. या योजनेत सुमारे अडीच कोटी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे, असंही आदिती तटकरेंनी सांगितलं.

२१०० रुपये कधीपासून?

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, आता लाडकी बहिण योजनेच्या २१०० रुपयांबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाऊ शकतो. जर अर्थसंकल्पात निर्णय झाला तर पुढच्या २-३ महिन्यात लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT