Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ७२ तासांत लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार! खात्यात खटाखट ₹१५०० जमा होणार

Ladki Bahin Yojana April Month Installment Update: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या ७२ तासांत महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा केला जाणार आहे.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही. परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या ७२ तासांत महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. (Ladki Bahin Yojana April Month Installment)

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याच्या अखेरपपर्यंत हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली होती. आता एप्रिल महिना संपायला फक्त ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे येत्या ७२ तासांत कधीही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना आनंद झाला आहे.

या महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना लाभ मिळणार नाही. दरम्यान, ज्या योजनांमध्ये महिलांना १५०० पेक्षा कमी रक्कम दिली जाते त्यामध्ये उर्वरीत रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. त्यामुळे उरलेले ५०० रुपये हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत.

या महिलांना मिळणार नाहीत पैसे

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत. या महिलांना एकही रुपया मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. याआधी इतर निकषांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. याआधीच काही महिलांना पैसे मिळणे बंद झाले आहेत. त्यानंतर अजून काही महिलांना पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Breast Cancer Symptoms: स्तनामध्ये दिसणारी गाठ म्हणजेच कर्करोग नाही; त्वचेवर दिसणारी ब्रेस्ट कॅन्सरची ही ५ लक्षणं वेळीच ओळखा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक प्रकृती बिघडली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द

Panvel Fort : पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासप्रेमींनी वीकेंडला करा भटकंती

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

SCROLL FOR NEXT