Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! महिन्याला ₹२१०० मिळणार? मोदी सरकारकडून महत्वाची अपडेट समोर

Ladki Bahin Scheme Maharashtra : लाडक्या बहिणींसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. महागाईमुळे EAC-PM ने लाडकी बहीण योजनेतला आर्थिक मदत वाढवण्याची शिफारस केली आहे.

Sakshi Sunil Jadhav

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली सर्वात प्रसिद्ध योजनांपैकी एक आहे. यामध्ये पात्र लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये दिले जातात. पण हेच पैसे २१०० रुपये कधी होणार? असा प्रश्न अनेक महिला सतत विचारत आहेत. महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान ही रक्कम वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. आता याच मुद्द्यावर केंद्राच्या एका महत्त्वाच्या अहवालामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (EAC-PM) सादर केलेल्या अभ्यास अहवालात महागाई वाढत असल्याने अशा योजनांमधील रोख मदतीची गरज असेल तर रक्कम काढवावी अशी शिफारस करण्यात आली आहे. या अहवालात महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिसातल्या सुभद्रा योजना यांचा अभ्यास करण्यात आला. अहवालानुसार, या योजनांमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. तसेच त्यांची बचत वाढायलाही सुरूवात झाली आहे.

महागाईचा विचार करून लाडकी बहीणसारख्या योजनांमध्ये आर्थिक मदत वाढवण्याची शिफारस EAC-PM ने केली आहे. अहवालानुसार महाराष्ट्रातल्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यातल्या सरासरी शिल्लक ८४ टक्क्यांनी, तर मासिक खर्च ४६ टक्क्यांनी वाढला आहे. महिलांना डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयं-सहायता गटांशी जोडण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

२१०० रुपये मिळणार का?

सध्या लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपये करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला नाही. केंद्राच्या अहवालात फक्त रक्कम वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार निर्णय घेतल्यानंतरच लाभार्थींना वाढीव रक्कम मिळू शकते.

८० लाख महिला अपात्र

दरम्यान राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ८० लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या. e-KYC अपूर्ण, पात्रतेचे निकष पूर्ण न करणे आणि अर्जामध्ये काही त्रुटी ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. अशा महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT