Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: प्रतीक्षा संपली! लाडक्या बहि‍णींना २१०० कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. लाडकींना आम्ही या अर्थसंकल्पात २१०० रुपये देऊ, अशी कोणतीही घोषणा आम्ही केली नव्हती, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अपडेट समोर येत आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दर महिन्याला दिले जात आहेत. दरम्यान, आता लाडकी बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. २१०० रुपयांबाबत आदिती तटकरेंनी मोठ वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहि‍णींना या अर्थसंकल्पीय धिवेशनात तरी २१०० रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न काल विधानसभेत विचारण्यात आले. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी मिळणार यावर आदिती तटकरेंनी उत्तर दिले आहे. लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये या अर्थसंकल्पात दिले जाणार असल्याची घोषणा आम्ही कधीच केली नव्हती. जाहीरनामा हा ५ वर्षांसाठी असतो, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

आदिती तटकरेंच्या या वक्तव्यामुळे महिलांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये यंदाच्या अर्थसंकल्पात मिळतील, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाही. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना आता पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात निर्णय होईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, आदिती तटकरेंच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

९ लाख महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेतून ९ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये. या योजनेतून ५० लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आयारामांच्या पक्षप्रवेशावरुन संकटमोचकासमोरच भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा|VIDEO

Postman: पोस्टमनच्याच घरात टपालाची ३ पोती, हजारो पत्रे धूळखात पडलेली, महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

ठाकरेंच्या युतीनंतर काल बेफाम नाचले, आज मनसेच्या प्रदेश सरचिटणीसने कमळ घेतलं|VIDEO

Blood Cancer: शरीरावर वारंवार दिसतात ही 2 लक्षणं, असू शकतो जीवघेणा ब्लड कॅन्सर, आताच व्हा सावध, अन्यथा...

SCROLL FOR NEXT